या सात राशीना आजचा दिवस आहे महत्वाचा ; जाणून घ्या

 माय अहमदनगर वेब टीम

बुधवार, २१ ऑक्टोबर २०२०. चंद्र गुरुचे स्वामीत्व असलेल्या धनु राशीत विराजमान असेल. नवरात्राचा पाचवा दिवस. गुरु आणि चंद्राच्या संयोगाने गजकेसरी योग जुळून येत आहे. कन्या राशीच्या व्यक्तींना विशेष लाभाचा दिवस. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकतील? जाणून घेऊया... 

आजचे मराठी पंचांग : बुधवार, २१ ऑक्टोबर २०२०

मेष : उपद्रवी लोकांच्या मागे जाऊ नका. धोकादायक ठिकाणी प्रवास करू नका. आजचा दिवस विशेष असू शकेल. समोरच्या व्यक्तींवर आपला प्रभाव राहील. आपले कौतुक केले जाईल. जमीन, मालमत्तेतून काही लाभ संभवतात. वडिलांचे शुभाशिर्वाद लाभतील. पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम असू शकेल. 

वृषभ : जळजळीत पदार्थांचे अतिसेवन टाळा. व्यवसायामध्ये तडजोड करावी लागेल. कष्टकारक दिवस. अन्य एखाद्या व्यक्तीमुळे आपल्या समस्येत भर पडण्याची शक्यता. सावधगिरी बाळगून व्यवहार करावा. हाती घेतलेली कामे पार पडतील. जोडीदाराशी असलेले नाते दृढ होईल. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम असू शकेल. 

मिथुन : आपले विचार जोडीदाराला समोर मांडा. दिवस आनंदी व उत्साही जाईल. बोलताना तारतम्य बाळगणे हिताचे ठरेल. आपल्या बोलण्याने समोरच्याचे मन दुखावणार नाही, याची काळजी घ्यावी. कोणाबद्दल वाईट चिंतू नये. प्रलंबित येणी प्राप्त होण्याचे संकेत. सारासार विचार करून घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील.

कर्क : आपला चांगला पराक्रम दिसून येईल. नोकरी, व्यवसायात अति घाई टाळा. संमिश्र घटनांचा दिवस. भावंडांशी मतभेद शक्य. कठोर मेहनत व परिश्रमांनंतरच यश व प्रगती साध्य करता येऊ शकेल. हितशत्रूंच्या कारवाया निष्प्रभ ठरतील. जनसंपर्कात भर पडेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भौतिस सुखासाठी पैसे खर्च होऊ शकतील. 

सिंह : शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन संधी सापडतील. सार्वजनिक क्षेत्रात आपला प्रभाव दिसून येईल. परोपकाराची भावना प्रबळ होईल. दिनक्रम व्यस्त राहू शकेल. आत्मविश्वाने केलेली कामे यशकारक ठरतील. खर्चात वाढ संभवते. नवीन योजना अमलात आणण्यास अनुकूल काळ. विरोधक पराभूत होतील. 

कन्या : घरामध्ये नवीन खरेदी कराल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. आजचा दिवस शुभ असेल. आरोग्यात सुधारणा होऊ शकेल. कष्ट काही प्रमाणात कमी होऊ शकतील. मुलांकडून शुभवार्ता मिळू शकतील. आप्तेष्टांकडून सहयोग प्राप्त होऊ शकेल. मन प्रसन्न राहील. बोलताना तारतम्य ठेवा. कार्यकौशल्याने हाती घेतलेले काम पूर्ण करू शकाल. 

तुळ : नातेवाईकांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. नोकरीच्या मुलाखतीमध्ये आत्मविश्वास बाळगा. विद्यार्थ्यांना उत्तम दिवस. अभ्यासातील आवड वाढीस लागेल. कार्यक्षेत्रात नवीन गोष्टी शिकायला मिळतील. आई-वडील, गुरु यांच्याप्रति निष्ठा कायम ठेवावी. सावधगिरी बाळगून व्यवहार करा. वाहन चालवताना योग्य ती खबरदारी घ्यावी. 

वृश्चिक : नातेवाईक मित्र यांच्याबरोबर दुरावलेले संबंध सुधारतील. नवीन गुंतवणूक फायद्याची ठरेल. मात्र, अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. मुलांनी केलेल्या कृतीमुळे मान, सन्मान वृद्धिंगत होतील. हितशत्रूंवर विजय प्राप्त करू शकाल. दिवसाच्या उत्तरार्धात प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे मन प्रफुल्लित आणि प्रसन्न होईल. 

धनु : मुलाखतीमध्ये अनपेक्षितरीत्या यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल. ज्ञानात भर पडेल. विद्या, बुद्धी क्षमता वाढेल. कुटुंबातील सदस्यांची संपूर्ण साथ लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण करता येऊ शकतील. कठोर मेहनतीने मनोकामना पूर्ण होतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील. मान, सन्मान, कीर्ती वाढेल. प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकेल. 

मकर : कोर्टकचेऱ्यांमध्ये अडकून घेऊ नका. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ जाईल. आजचा दिवस शुभ असेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. नको त्या प्रलोभनात पडू नका. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. पुण्य कार्यातून लाभ मिळू शकतील. 

कुंभ : महत्वाचे निर्णय घेताना गोंधळून जाऊ नका. व्यवसाय क्षेत्रात स्वतःच्या कार्यातच प्रगती करा. मिळकत वाढीसाठी करण्यात येणारे प्रयत्न यशस्वी ठरू शकतील. भाग्याची भक्कम साथ प्राप्त होऊ शकेल. नवीन मित्र जोडले जाऊ शकतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. नवीन ओळखी संभवतात. 

मीन : हातातले काम सोडून दुसऱ्या कार्याच्या मागे धावू नका. न पटणाऱ्या गोष्टी शांत राहूनच पाहा. ग्रहांची अनुकूलतेमुळे शुभ आणि चांगले योग असल्याचे संकेत. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता. दिवसाच

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post