आयुर्वेदिक वनस्पतींपासून केस व त्वचेच्या समस्या कशा दूर कराव्यात, जाणून घ्या पद्धत

 


माय अहमदनगर वेब टीम

हेेल्थ डेस्क -  त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आपल्यापैकी बहुतांश जण ब्युटी पार्लरमध्ये जातात किंवा महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सवर भरपूर पैसा खर्च करतात. नको- नको ते उपाय करूनही समस्या जैसे थेच. केमिकलयुक्त ब्युटी ट्रीटमेंट करण्याऐवजी नैसर्गिक उपचारांची मदत घेण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळींकडून दिला जातो. कारण यामुळे आपल्या त्वचा व केसांवर दुष्परिणाम होत नाहीत. निसर्गाकडून आपल्याला कित्येक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा खजिना मिळाला आहे. तज्ज्ञमंडळींचा सल्ला घेऊन आयुर्वेदिक वनस्पतींचा योग्य पद्धतीने उपयोग केल्यास त्या त्वचा आणि केसांसाठी वरदान ठरू शकतात. 


आपल्या आसपास अशा कित्येक औषधी वनस्पती आहेत, ज्यांच्या उपयोगी गुणधर्मांपासून आपण अनभिज्ञ आहोत. या वनस्पतींचा उपयोग पावडर, पेस्ट किंवा तेल इत्यादी स्वरुपात केला जाऊ शकतो. केस व त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी कोणकोणत्या औषधी वनस्पती प्रभावी उपाय ठरू शकतात, याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

(हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी, रवीना टंडनने ब्युटी टिप्ससह सांगितली योग्य पद्धत)

​कोंडा दूर करण्यासाठी कडुलिंब


कडुलिंब ही बहुगुणी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. आपल्या सौंदर्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी कित्येक उपचारांमध्ये या वनस्पतीचा हजारो वर्षांपासून उपयोग केला जातोय. कोंडा कमी करण्यासाठी बहुतांश जण कडुलिंबाच्या पानांचा वापर करू शकतात. कडुलिंबातील पोषण तत्त्वे टाळूवर जमा झालेली दुर्गंध स्वच्छ करतात आणि कोंड्याची समस्या दूर ठेवण्याचे कार्य करतात.


कसा करावा वापर: कपभर पाणी आणि मूठभर कडुलिंबाची पाने एकत्र घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट वाटून घ्या. ही पेस्ट दह्यासोबत मिक्स करा आणि टाळूवर योग्य पद्धतीने लावा. १५ ते २० मिनिटांनंतर केस स्वच्छ धुऊन घ्या.


(Ice Cubes For Face जाणून घ्या हळद-दुधाच्या आइस क्युबने चेहऱ्यावर मसाज करण्याची पद्धत)

​मुरुम कमी करण्यासाठी टी-ट्री ऑइल


मुरुमांच्या समस्येमुळे जगभरातील कित्येक लोक त्रस्त आहेत. बॅक्टेरिअल इन्फेक्शन, रोमछिद्रांमध्ये दुर्गंध जमा होणे इत्यादी कारणांमुळे मुरुमांची समस्या उद्भवते. टी-ट्री ऑइलमध्ये अँटी बॅक्‍टेरियल, अँटी मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. हे गुणधर्म आपली त्वचा स्वच्छ करण्यासह मुरुमांची समस्या दूर करण्यास मदत करतात. यामुळे ब्युटी केअर रुटीनमध्ये टी-ट्री ऑइलचा समावेश केला जातो.


कसा करावा वापर : टी-ट्री ऑइलचे दोन थेंब नारळ किंवा बदामाच्या तेलात मिक्स करा. ज्या ठिकाणी मुरुम आले आहेत तेथेच हे मिश्रण लावा. १० ते १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.


(मॉडेल्सची त्वचा मेकअपशिवाय कशी दिसते इतकी नितळ? जाणून घ्या त्यांचे १० मोठे ब्युटी)

​नितळ त्वचेसाठी तुळस


तुळशीमध्ये अँटी बॅक्‍टेरियल, अँटी फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. हे घटक मुरुम, सुरकुत्या आणि ब्लॅकहेड्स दूर करण्याचे कार्य करतात. तुळशीचा लेप चेहऱ्यावर लावल्यास चेहरा नितळ आणि निस्तेज दिसू लागतो.


कसा करावा वापर : तुळशीचा लेप लावण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. थोडेसे पाणी आणि तुळशीची पाने एकत्र घेऊन पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटांसाठी लावा. यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून कमीत कमी दोनदा हा उपाय करावा.


(Hair Care Tips केसांच्या वाढीसाठी नेमकी काय घ्यावी काळजी? हेअर प्रोडक्ट्सचा)

​सनबर्न कमी करण्यासाठी कोरफड


त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी कोरफड अतिशय प्रभावी उपाय आहे. सनबर्नच्या त्रासातून तुम्हाला सुटका हवी असल्यास कोरफड जेलचा वापर करावा. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे त्वचेसाठी पोषक आहेत. कोरफडच्या वापरामुळे त्वचेला थंडावा मिळतो.


कसा करावा वापर : सनबर्न कमी करण्यासाठी कोरफडच्या ताज्या गराचा वापर करावा. हलक्या हाताने त्वचेचा मसाज करा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता.


(व्हॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर बारीक पुरळ आणि खाज येते का? जाणून घ्या हे ५ घरगुती उपाय)

​केसगळती रोखण्यासाठी पेरूच्या झाडाची पाने


पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन, झिंक, प्रोटीन, पोटॅशियम आणि अन्‍य प्रकारच्या खनिजांचा समावेश आहे. हे घटक केसगळतीची समस्या दूर करण्याचे आणि केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्याचे कार्य करतात.


कसा करावा वापर : एक ते दोन लीटर पाणी उकळत ठेवा. यामध्ये जवळपास दोन मूठ पेरूची पाने मिक्स करा. पाणी उकळून आटल्यानंतर गॅस बंद करा. थोड्या वेळानंतर पेरूच्या पानांचं पाणी मुळांसह संपूर्ण केसांना लावा. आठवड्यातून दोनदा हा उपाय तुम्ही करू शकता.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post