तुमची रास कोणती ? कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल?माय अहमदनगर वेब टीम

शनिवार, १७ ऑक्टोबर २०२०. शारदीय नवरात्रारंभ. विशेष म्हणजे सूर्य कन्या राशीतून तुळ राशीत प्रवेश करत आहे. याला तुळ संक्रांत असेही म्हटले जाते. तुळ राशीत बुध आणि चंद्र पहिल्यापासून विराजमान आहेत. यामुळे सूर्य, चंद्र आणि बुधचा त्रिग्रही योग जुळून येत आहे. याचा काही राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकेल. तुमच्यासाठी नवरात्राचा पहिला दिवस कसा असेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळतील? जाणून घेऊया...

आजचे मराठी पंचांग : शनिवार, १७ ऑक्टोबर २०२०

मेष : घरामधील महत्त्वाच्या चर्चेत स्त्रीवर्गाच्या मतांचा विचार करा. विद्यार्थी वर्गाला चांगला काळ. आजचा दिवस आपल्यासाठी शुभ असेल. हाती घेतलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील. मन प्रसन्न राहील. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद संभवतात. दिवसाच्या उत्तरार्धात योजनापूर्तीचा आनंद होईल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

वृषभ : संभ्रमित अवस्थेत असला तर आपला निर्णय पुढे ढकला. घरातील कामासाठी वेळ बाजूला ठेवा. दिवसभरात काही ना काही समस्या उद्भवू शकतील. नोकरदार आणि व्यापारी वर्गाचा कामात व्यत्यय येईल. कार्यकौशल्याच्या जोरावर विरोधकांना पराभूत करू शकाल. गृहपयोगी वस्तूंची खरेदी कराल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. चांगल्या गोष्टींसाठी पैसे खर्च होतील. मान, सन्मान वाढतील. 

मिथुन : नवीन गोष्ट शिकण्यासाठी उत्तम काळ. इच्छुकांचे लांबलेले विवाह ठरतील. ग्रहांचा प्रभाव समस्याकारक ठरू शकेल. अगदी शेवटच्या टप्प्यात काम बिघडू शकेल. कार्यक्षेत्रात वादाचे प्रसंग उद्भवू शकतील. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतील. मुलांच्या वर्तन त्रस्त करू शकेल. वाहन चालवताना योग्य ती खबरदारी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवून कार्यरत राहणे हिताचे ठरू शकेल.

कर्क : घरातील अडचणीच्या घडामोडींवर तोडगा निघेल. स्थैर्य असलेल्या व्यवसायात गुंतवणूक करा. ग्रहांची अनुकूलता भाग्यकारक ठरेल. आप्तेष्टांचे उत्तम सहकार्य लाभेल. सामंजस्याने काही गोष्टी हाताळाव्या लागतील. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. जोडीदाराचे मदत मोलाची ठरू शकेल. नोकरदार वर्गाला प्रगतीकारक दिवस. मानसिक शांतता मिळू शकेल. 

सिंह : नवीन नोकरीच्या मुलाखतीत यश येईल. मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. समाजातील प्रतिमा सुधारेल. नवीन काम सुरू करण्यापूर्वी सर्व गोष्टी तपासून घ्याव्यात. कोणावरही अंधविश्वास ठेऊ नका. कर्जाचे व्यवहार आज करू नका. पदोन्नतीचे योग. गुरुच्या प्रभावामुळे भाग्याची उत्तम साथ लाभेल. 

कन्या : नवीन क्षेत्रातील गुंतवणूक योग्य व्यक्तीच्या सल्ल्याविना करू नका. मोठी वाहने चालवताना काळजी घ्या. आजचा दिवस शुभ असून, हाती घेतलेली सर्व कामे पार पडतील. मित्रांसोबत उत्तम काळ व्यतीत होऊ शकेल. मान, सन्मान मिळतील. जबाबदारी वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल

तुळ : आयुष्यातील चालू घडामोडींना चांगली गती मिळेल. हितचिंतकांकडून लाभ होईल. ग्रहांची अनुकूलता सुखकारक ठरू शकेल. गृहपयोगी आणि आवडत्या वस्तूंची खरेदी कराल. जोडीदाराचे सहकार्य आणि सानिध्य मिळू शकेल. व्यवसाय वृद्धी वा विस्ताराचे प्रयत्न यशकारक ठरतील. मान, सन्मान वाढीस लागेल. मात्र, दिवसाच्या उत्तरार्धात मौल्यवान वस्तू गहाळ होण्याचे संकेत. सावध राहावे. 

वृश्चिक : कोणाकडून फसवणूक होऊ देऊ नका. व्यवसाय क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. एखाद्या व्यक्तीसाठी व्यवस्था करण्यात दिवस व्यतीत होऊ शकेल. धावपळ संभवते. परोपकार केल्याचे समाधान मिळू शकेल. कार्यालयातील सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतील. केवळ आपल्या कामाकडे लक्ष केंद्रीत करावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. 

धनु : कामाचा पसारा आवरता ठेवा. खात्री करूनच समोरच्यावर विश्वास ठेवा. विनाकरण मन अशांत राहील. धैर्य आणि मृदू व्यवहाराने वातावरण अनुकूल होऊ शकेल. काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. दिवसाचा उत्तरार्ध हास्य-विनोद, मौज-मजा करण्यात जाईल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. शुभवार्ता मिळू शकतील. 

मकर : नोकरीमध्ये अति कामाच्या अंगावर आलेल्या बोजाचे योग्य पद्धतीने नियोजन करा. नवीन करारात आपण भागीदार होऊ शकाल. कुटुंबातील व्यक्तीच्या प्रकृतीची चिंता लागू राहील. वाहन चालवताना योग्य ती खबरदारी घ्यावी. जोखीम पत्करू नका. कोणालाही कर्ज देणे टाळावे. 

कुंभ : भागीदारी व्यवसायात नवीन संधी चालून येईल. छोटे प्रवास घडतील. मोठे यश प्राप्त होऊ शकेल. आनंदाची अनुभूती घेऊ शकाल. जोडीदाराशी असलेले नाते दृढ होऊ शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. बाहेर फिरायला जाण्याची इच्छा प्रबळ होईल. ऊर्जा

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post