शिवाजी कर्डिले हे जनतेच्या मनातील आमदार : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील


 माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर: राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातील जनता आजही माजी मंत्री शिवाजी कर्डिले आमदार नसताना यांच्याकडे विविध प्रश्‍न घेऊन येतात व ते सोडविण्याचे काम कर्डिले करतात. गेली २५ वर्षे त्यांनी विकास कामाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये घरात न बसता नागरिकांना आधार व धीर देण्याचे काम केले आहे. आर्थिक संकटाच्या काळात विविध सामाजिक उपक्रम राबविले. प्रत्येक गावामध्ये नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी गावोगावी फिरत असतात. त्यामुळेच ते जनतेच्या मनातील आमदार आहेत, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

बुऱहाणनगर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचा सत्कार करताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आ. बबनराव पाचपुते, आ. मोनिकाताई राजळे, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, शहराध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे, भाजपा प्रभारी प्रदीप पेसकर, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी कर्डिले म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळामध्ये २५ वर्षांच्या आमदारकीमध्ये सर्वात जास्त निधी मतदारसंघामध्ये आणला. आजही मतदारसंघात ही कामे चालू आहेत. विकासकामे मंजूर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. मतदारसंघातील कुठलेही काम घेऊन गेल्यावरती राज्य सरकारने वेळोवेळी मोठा निधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळेच राहुरी मतदारसंघातील जनतेला विकास कामे काय आहेत, हे माहिती झाले. असे ते

म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post