टर्म इन्शुरन्स प्लान लोकांना का आवडतात ठाऊक आहे?

 


माय अहमदनगर वेब टीम

भारतात टर्म इन्शुरन्स प्लान अर्थात मुदत विमा लोकांना मोठ्या प्रमाणावर आवडतात. काही वर्षांपूर्वी, टर्म इन्शुरन्स प्लान हे विमा कंपन्यांकडून ग्राहकांना प्रामुख्याने आणि आग्रहाने सुचवले जात. मात्र काही दिवसांनी या धोरणात बदल झाला. टर्म इन्शुरन्स प्लानमध्ये प्राईज्ड टर्म इन्शुरन्स प्लान्स काही विमा कंपन्यांनी आणले. त्यानंतर ग्राहकांना या टर्म इन्शुरन्स प्लानचं महत्त्व पटू लागलं. त्यामुळे आता इन्शुरन्स कंपन्या टर्म इन्शुरन्स प्लान हे एखाद्या ऑन बोर्डिंग टूलप्रमाणे नव्या ग्राहकांसाठी वापरतात. टर्म इन्शुरन्स प्लानचे विविध पर्याय या कंपन्यानी ऑनलाइन उपलब्ध करुन दिले आहेत.

तुम्ही हे टर्म इन्शुरन्स प्लान का विकत घेतले पाहिजेत याची अनेक कारण आहेत. मात्र आज तुम्हाला आम्ही महत्त्वाच्या आणि तुमचा फायदा होणाऱ्या टर्म इन्शुरन्स प्लान बाबत सांगणार आहोत.

टर्म इन्शुरन्स प्लान तुम्ही का विकत घ्यावा? त्याची पाच प्रमुख कारणं जाणून घ्या.

आपल्या माणसांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चांगला पर्याय

मी असं सांगेन, टर्म इन्शुरन्स प्लान घेणं हे आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरतं. ज्यामुळे तुम्ही मानसिक आणि आर्थिक विवंचना यापासून लांब राहू शकता. बँकेत तुमचे पैसे सुरक्षित असतात. ते असणं ही बाब निश्चितच महत्त्वाची असते. मात्र अनेकदा आपल्याला गृह कर्ज, मुलांच्या शिक्षणासाठीचं कर्ज, कारसाठीचं कर्ज, मुलाचा, मुलीचा विवाह, औषधं, घर दुरुस्ती या आणि अशा अनेक कारणांसाठी पैसे लागतात. अशा वेळी तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवणं हा एकमेव पर्याय तुमच्यासमोर असतो. नोकरीला लागल्यापासून ते निवृत्त होईपर्यंत उत्पन्न वाढत राहणं आवश्यक असतं. अशा वेळी तीस वर्षांसाठीचा टर्म इन्शुरन्स प्लान उपयुक्त ठरतो. मध्यमवर्गीयांनाही हा प्लान सहज परवडू शकतो. ३० वर्षांसाठी वार्षिक हप्ता ७ हजार ७८८ रुपये असलेला हा टर्म इन्शुरन्स प्लान आहे. ज्यामध्ये १ कोटी रुपयांचे कव्हर मिळते. तसंच वार्षिक ७ हजार ७८८ रुपयात तुमचे आणि तुमच्या कुटुंबीयांचे रक्षणही होते.

अत्यंत किफायतशीर आणि स्वस्त असलेला प्लान

तुम्ही तरुण असताना १ कोटी कव्हर असलेला ३० वर्षांचा प्लान घेणं अत्यंत फायद्याचे ठरते

उदाहरणार्थ

तुमचे वय ३० असेल तर वार्षिक हप्ता ७ हजार ७८८ रुपये

तुमचे वय ३५ असेल तर वार्षिक हप्ता ९ हजार ९१२ रुपये

तुमचे वय ४० असेल तर वार्षिक हप्ता १३ हजार २१६ रुपये

तुमचे वय ४५ असेल तर वार्षिक हप्ता १७ हजार ७०० रुपये

वय वाढलं की प्रीमीयममध्ये वाढ होते. त्यामुळे तुम्ही तरुण असतानाच हा प्लान घेतला तर तो तुम्हाला स्वस्तात मिळू शकतो.

टर्म प्लानच्या किंमती कमी, पण इन्शुरन्स कंपन्या असतात चोखंदळ

मी तुम्हाला हेदेखील सांगू इच्छितो की, टर्म प्लानच्या वार्षिक हप्त्याच्या किंमती कमी असतात, मात्र नव्या ग्राहकांचं वय जास्त असल्यास इन्शुरन्स कंपन्या काहीप्रमाणत चोखंदळ असतात. कारण वय वाढतं तसं आरोग्याची काळजीही वाढते. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक आजारांचंही प्रमाण वाढतं आहे. आपल्यापैकी बहुतांश लोकांच्या नोकऱ्या, त्यांच्या कामाचं स्वरुप हे आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असतात. नोकरीत वाढते तणाव किंवा इतर गोष्टींमुळे आजार उद्भवण्याची शक्यता असते. असे झाल्यास अशा ग्राहकांना टर्म इन्शुरन्स प्लान देण्यासाठी कंपन्या रिस्क घेत नाहीत. समजा अशा ग्राहकांना प्लान दिलेच तर त्यांचा प्रिमियमही वाढत जातो. त्यामुळेच शक्यतो तरुण असतानाच टर्म प्लान विकत घ्या, जो किफायतशीर किंमतीचा असेल. तसेच आरोग्य बिघडल्याने किंवा एखाद्या आजारामुळे तो घेता येणार नाही असे होणार नाही.

अत्यंत चांगल्या रकमेचे कव्हर देणारे प्लान्स

टर्म इन्शुरन्स म्हटलं की मृत्यू पश्चात मिळणारं कव्हर हा विषय महत्त्वाचा ठरतोच. खरंतर असं काहीही न घडता टर्म प्लान घेणं सोयीचं असतं. पण अत्यंत वाईट बाब म्हणजेच मृत्यू ओढवलाच तर अनेक कुटुंबाची वाताहात होते. घरी कमावणारा माणूस एकच असतो. त्याचा अपघाती किंवा अकस्मात मृत्यू झाला तर घरी येणारे उत्पन्नही बंद होते. असाध्य आजार, अपघात त्यातून घडणाऱ्या अशा घटना यासाठीही टर्म प्लान घेणं आवश्यक असतं.

टर्म प्लानचे स्मार्ट पर्याय

चला तर आता मी तुम्हाला सांगतो की टर्म प्लानचे स्मार्ट पर्याय कोणते आहेत

वयाच्या ९९ व्या वर्षापर्यंत कव्हर: हे कव्हर तुम्हाला तुमच्या आयुष्यभरासाठी पुरेल. फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्यावर प्रेम करणाऱ्या तुमच्या कुटुंबीयांनाही हे उपयुक्त आहे. यामध्येही पेआऊट हा खात्रीशीर रित्या आहे.

मर्यादित पे- ५ किंवा १० वर्षांसाठी पॉलिसीचे प्रीमीयम भरा आणि पॉलिसी टर्म संपेपर्यंत कव्हरद्वारे मिळणारे पैसे तुम्हाला उपयोगी पडतील. आत्ता तुम्ही नोकरी करत असाल तर हा पर्याय निवडा, मर्यादित वर्षांसाठी प्रीमीयम भरा आणि त्यानंतर टर

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post