व्यवसायात अचानक चांगली उसळी होईल ; वाचा आजचे भविष्य


 माय अहमदनगर वेब टीम

रविवार, ११ ऑक्टोबर २०२०. चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीत विराजमान असेल. वृषभ राशीच्या व्यक्तींना धावपळ करताना सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल. तर मिथुन राशीच्या व्यक्तींना अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना नेमके काय लाभ मिळतील? जाणून घेऊया...


आजचे मराठी पंचांग : रविवार, ११ ऑक्टोबर २०२०

मेष : तडकाफडकी निर्णय बदलू नका. शासनाकडून सन्मान संभवतो. कर्जाचे व्यवहार न करणे हिताचे ठरेल. जुन्या मित्रांशी झालेल्या संवादांमुळे छान वाटेल. जनसंपर्कात भर पडेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. दिवसाचा उत्तरार्ध हास्य-विनोद, मजा-मस्ती करण्यात व्यतीत होऊ शकेल. 


वृषभ : मुलांकडून सर्व अपेक्षा पूर्ण केल्या जातील. दिनक्रम व्यस्त राहण्याची शक्यता. मात्र, धावपळ करताना सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होऊ शकतील. त्यातून आनंद, समाधान, लाभ मिळेल. दिवसाच्या उत्तरार्धात मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल. 

मिथुन : कुठल्यातरी गूढ स्वप्नवत वातावरणात रमून जाल. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे हितकारक ठरू शकेल. एखादा जुना आजार त्रस्त करू शकेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळू शकतील. सामाजिक कामांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतील. 

कर्क : आपल्या बोलण्याने लोकांची मने जिंकाल. भाग्याच्या दृष्टीने उत्तम दिवस. आपण घेत असलेल्या परिश्रमांचे योग्य फळ मिळू शकेल. मुलांप्रतीचा विश्वास आणखीन वृद्धिंगत होईल. सहकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य प्राप्त होऊ शकेल. आवडीसाठी खर्च कराल. हितशत्रूंच्या कारवाया निष्प्रभ ठरतील. पालकांचे शुभाशिर्वाद लाभतील. 

सिंह : आपल्या कर्तृत्वावर नवीन कार्याची पायाभरणी करा. संमिश्र घटनांचा दिवस. मानसिक तणाव संभवतो. आई-वडिलांच्या मदतीमुळे दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल होऊ शकेल. सासरच्या मंडळींशी मतभेत शक्य. बोलताना तारतम्य बाळगणे हिताचे ठरू शकेल. नेत्रविकार त्रस्त करू शकतील. प्रकृती जपा. 

कन्या : नवीन गुंतवणुकीबाबत सतर्क रहा. ऊर्जा आणि सकारात्मकतेमुळे उत्साहात कार्यरत राहाल. कठीण वाटणारी कामे सुलभतेने पार पडतील. पालकांचे उत्तम सहकार्य लाभेल. एखाद्या प्रसंगामुळे मन खिन्न होऊ शकेल. विनाकारण खर्च संभवतात. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. धनवृद्धीचे योग जुळून येऊ शकतील. आपल्या वर्तणुकीचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकेल. 

तुळ : जवळच्या व्यक्तीकडून अनपेक्षित लाभ होतील. शुभ दिवस. अधिकार आणि संपत्तीत वृद्धी शक्य. गरजूंना मनापासून मदत कराल. नवीन कामांत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकेल. भविष्यात उत्तम लाभ मिळतील. गुरुप्रति असलेली निष्ठा कायम ठेवावी. कौटुंबिक वातावरण उत्साही व आनंदी राहील. 

वृश्चिक : घरातील वातावरणामुळे कौटुंबिक समाधान लाभेल. व्यापार वृद्धीसाठी सुरू असलेले प्रयत्न अपेक्षित परिणाम देतीलच असे नाही. दिवसाच्या उत्तरार्धात धैर्य, संयम बाळगून परिस्थिती हाताळणे हितकारक ठरू शकेल. विरोधात पराभूत होतील. एखादे जुने वादाचे प्रकरण निवळायला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. 

धनु : घरामध्ये छानछोकीसाठी पैसे खर्च होतील. ज्ञानात भर पडेल. दान-धर्म, परोपकारात दिवस व्यतीत होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भाग्याची उत्तम साथ लाभू शकेल. आर्थिक स्थिती उत्तम असेल. मात्र, दिवसाच्या उत्तरार्धात अपचनाचा त्रास संभवतो. आहारावर नियंत्रण ठेवावे. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. 

मकर : आपली जुनी येणी विनासायास वसूल होतील. आजचा दिवस शुभ असेल. एखादी बहुमूल्य वस्तू प्राप्त होऊ शकेल. मात्र, अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवाणे हिताचे ठरेल. सासरच्या मंडळींकडून मान, सन्मान मिळतील. नवीन कार्यात गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल दिवस. भविष्यात यातून चांगले लाभ मिळू शकतील. 

कुंभ : जोडीदाराकडून अनपेक्षित गिफ्ट मिळेल. विवेकाने आणि बुद्धीने निर्णय घेणे योग्य ठरेल. मर्यादित प्रमाणात खर्च करणे हिताचे ठरेल. एखाद्याकडून फसवणूक होण्याची शक्यता. दिवसाच्या उत्तरार्धात छोटे प्रवास संभवतात. यातून लाभ मिळण्याची शक्यता. जुन्या मित्रांशी झालेले संवाद मन प्रसन्न करेल. 

मीन : व्यवसायात अचानक चांगली उसळी होईल. सामाजिक मान, सन्मान मिळतील. मनोबल वाढेल. मुलांशी झालेला एखादा जुना वाद मिटू शकेल. जनसंपर्कात भर पडू शकेल. नवीन ओळखी होतील. दिवसाचा उत्तरार्ध हास्य-विनोद, मौज-मजा करण्यात व्यतीत होऊ शकेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post