सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा : माजी मंत्री कर्डिले

 


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर: भाजप सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांवर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा भाजप सरकारने शेतकऱ्यांना विविध योजनेमार्फत मदत केली. केंद्र व राज्य सरकारने मिळून मोठी कर्जमाफी केली. यावर्षी मोठ्याप्रमाणात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी या तीन पक्षाच्या सरकारने लवकरात लवकर पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. या अतिवृष्टीमुळे नगर जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करावा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या काळामध्ये विविध योजनेमार्फत शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये आर्थिक मदतीचा लाभ दिला. गावोगावी सचिव व बॅकेच्या शाखाधिकाऱ्यांच्या चांगल्या कामामुळे नगर जिल्ह्याला सुमारे १ हजार ५00 कोटी पैकी १४५0 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली. कोरोना संकटाच्या काळामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खेळते भांडवल म्हणून आर्थिक मदत अकोळनेर, मांडवे, नारायणडोह, उक्कडगाव, चास, भोयरे पठार यांना सुमारे १२ कोटींपर्यंत कर्ज वाटप करण्यात आले, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या वतीने अकोळनेर, नारायण डोह ,चास, भोयरे पठार व उक्कडगाव येथील शेतकऱ्यांना खेळते भांडवलचा चेक वाटप करताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले. या कार्यक्रमासाठी बाजार समिती सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, विजय जाधव, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुरेशराव सुंबे, दिलीप भालसिंग, रेवणनाथ चोभे, शिवाजी कार्ले, संतोष कुलट, बाळासाहेब निमसे, बाबासाहेब जाधव, अशोक झरेकर, नंदा शेंडगे, सविता मेहत्रे, शितल जाधव, संजय गारूडकर, राजेंद्र शेळके, रावसाहेब साठे, साहेबराव कोळगे, सुभाष गवळी, राधाकृष्ण वांळुज, राजेंद्र गावखरे, पोपट घुंगार्ड, रावसाहेब कार्ले, पांडुरंग देवकर, रामदास सोनवणे, अशोक साठे, छत्रपती बोरुडे, बाळासाहेब मेटे, मच्छिंद्र साठे, बाळासाहेब म्हस्के किशोर गायकवाड उपस्थित होते.

यावेळी राधाकृष्ण वाळुंज म्हणाले की, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी नगर तालुक्‍याचे १५ वर्षे आमदार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढवून आमदार झाले. परंतु नगर तालुक्‍्याकडे कधीही दुर्लक्ष

केले नाही. तालुक्‍यातील प्रत्येक व्यक्तीचे काम केले. आता शेतकरी आर्थिक संकटात असताना जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रत्येक गावाला खेळते भांडवल म्हणून मदत करण्याचे काम सुरु केले आहे. शेतकऱ्यांची कुठलीही अडवणूक न करता शेतकऱ्यांना कमी कागदपत्रामध्ये कर्ज मिळण्याचे काम पहिल्यांदाच घडले आहे. सर्वच्या सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याचीही पहिलीच वेळ आहे, असे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post