काँग्रेस संघटनात्मक बांधणीसाठी काँग्रेसच्या युवा नेत्यांची जिल्हा वारी

 


माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : युवक काँग्रेस, एनएसयुआयच्या संघटनात्मक बांधणीसाठी काँग्रेस पक्षाने आता जिल्ह्यातील आपल्या युवा नेत्यांना मैदानात उतरविले आहे. 

अहमदनगर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा युवक, एनएसयुआय जिल्हा समन्वयक किरण काळे त्याचबरोबर युवक काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक अकीलभाई पटेल, जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एनएसयुआय जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा हे शुक्रवारपासून जिल्हा दौरा करत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बैठका घेणार आहेत. 

याबाबत माहिती देताना सोमेश्वर दिवटे आणि निखील पापडेजा म्हणाले की प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात साहेब, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या सूचनेवरून हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. 

काँग्रेस पक्षामध्ये युवकांना त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जात आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी युवक व विद्यार्थ्यांना एकत्रित करत संघटनात्मक बांधणीसाठी मोट बांधण्याचे काम युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली केले जाणार आहे. 

या दौऱ्यानंतर तालुकास्तरावरील नियुक्त्या अंतिम केल्या जाणार असून वरिष्ठ नेत्यांच्या मान्यतेनंतर त्यांची घोषणा केली जाणार आहेत. 

दौरा पुढीलप्रमाणे : दि.१६ ऑक्टोबर - अकोले, कोपरगाव, शिर्डी, राहता, दि.१७ - राहुरी, श्रीरामपूर, नगर तालुका, नगर शहर, दि.१८ -  नेवासा, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड, दि. १९  - श्रीगोंदा, पारनेर, संगमनेर. 

आ.डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी झूम मीटिंग घेत युवक व विद्यार्थी संघटनेचा आढावा घेतला आहे. 

काँग्रेस इलेक्शन मूडमध्ये 

जिल्ह्यातील अकोले, कर्जत, पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकांचे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे. नुकत्याच काँग्रेसच्या नगरपालिका निहाय निरीक्षक व तालुका प्रभारी यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यापाठोपाठ आता युवक, विद्यार्थी संघटना बांधणीसाठी पक्षाच्यावतीने जिल्हा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपंचायत बरोबरच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवकांचे संघटन मजबूत करण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू असल्यामुळे काँग्रेस इलेक्शन मूडमध्ये असल्याचे दिसत आहे.यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post