नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करा अन्यथा आंदोलन - कोकाटे

 


अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी भाजपा आक्रमक,

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - नगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा या मागणीसाठी नगर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने अहमदनगर तहसील कार्यालय येथे निदर्शन करून नायब तहसीलदार अभिजीत बारवकर व प्रवीना तडवी यांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, जिल्हा उपाध्यक्ष शामराव पिंपळे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेश लांडगे, तालुका सरचिटणीस बाप्पूसाहेब बेरड, गणेश भालसिंग, तालुका उपाध्यक्ष उमेश डोंगरे, प्रशांत गहिले, कोषाध्यक्ष गोवर्धन शेवाळे, चिटणीस बबन शिंदे, प्रसिद्धी प्रमुख सागर भोपे, विक्रम पालवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कोकाटे यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यापासून शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत असताना यंदा सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणीमोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे ऊस, मुग, उडीद, सोयाबीन, मका इत्यादी सारखी अनेक पिके नष्ट झाली आहे.  अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडला आहे. सोयाबीन पिकाच्या बाबतीत अगोदरच बोगस बियाणे मिळाले असल्याने अनेक ठिकाणी दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणी केल्यानंतर सोयाबीनचे पीक बऱ्यापैकी आलेले असताना अतिवृष्टीमुळे पीक नष्ट झाले आहे दोनदा किंवा तीनदा बियाण्यासाठी खर्च करावा लागत आहेत्यासोबत खताच्या सुद्धा खर्च दुप्पट तर काही ठिकाणी तिप्पट झालेले आहेत अशा परिस्थितीत उत्पन्न मात्र शून्य अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर संकटा मागून संकटे येत आहे अशा परिस्थितीत प्रशासनाने खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे त्यामुळेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत अशी मागणी भाजपा नगर तालुक्याच्या वतीने करण्यात आली असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समवेत रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी देण्यात आला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post