न्यायालय इमारतीचे व वकिलांचे प्रलंबित सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मार्ग काढू : अॅड. सुभाष घाडगेमाय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - राज्यातील वकील वर्गासाठी महाराष्ट्र गोवा बार कॉन्सिल तळमळीने काम करत आहे. लॉकडाऊन काळात राज्यातील अडचणीत व संकटात सापडलेल्या वकिलांसाठी राज्य शासना कडे तीन वेळा मदतीची मागणी केली पण त्यांना जाग आली नाही. पण बार कॉन्सिल गप्प न बसता गरजू वकिलांच्या मदतसाठी सुमारे तीन कोटी चाळीस लाखाचा निधी उभारला. न्यायालयीन कामकाज कमी झाले असलेतरी न्यायाधीश व कर्मचाऱ्यांचे पगार चालू आहेत. वकिलांना मात्र काम व उत्पन्नाचे साधन नसल्याने जो पर्यंत कोविडचा प्रादुर्भाव आहे तोपर्यंत अर्थसहाय्या देण्याची मागणी केली आहे. वकिलांसाठी कोविड उपचारासह ग्रुप आरोग्य विमा सुरु केला आहे. तसेच सदस्यांसाठी पेन्शन योजनाही राबवत आहोत. बार कॉन्सिल सदस्यांची लॉकडाऊन नंतरची प्रथमच प्रत्यक्ष मिटिंग दोन दिवसांनी होत आहे. या मिटींगमध्ये नगरच्या न्यायालयाच्या इमारतीचे व वकिलांचे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मार्ग काढणार आहोत, असे आश्वासन महाराष्ट्र गोवा बार कॉन्सिलचे अध्यक्ष अॅड. सुभाष घाडगे यांनी दिले.

महाराष्ट्र गोवा बार कॉन्सिलचे अध्यक्ष अॅड. सुभाष घाडगे, माजी अध्यक्ष अॅड. विठ्ठल कोंदे देशमुख, सदस्य अॅड. सुदीप पासबोला, नगरचे सुपुत्र अॅड. उदय वारुंजीकर आदींनी जिल्हा न्यायालयाला भेट दिली असता सेन्ट्रल बार असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष अॅड. सुभाष काकडे, उपध्यक्ष अॅड. समीर सोनी, महिला उपाध्यक्षा अॅड. मंगला गुंदेचा, सचिव अॅड. योगेश काळे, खजिनदार अॅड. अभिजित देशपांडे आदींनी सर्वांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी प्रमुख विधीज्ञ उपस्थित होते

या कार्यक्रमात बारचे सदस्य अॅड. राजेश कातोरे यांनी नगरसेवक पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. अॅड. नीलमणी गांधी यांना अंतराष्ट्रीय स्तरावर मध्यस्थी म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच करोनावर मात केलेले जेष्ठ विधीज्ञ अशोक कोठारी यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी अॅड. उदय वारुंजीकर म्हणाले, नगरच्या न्यायालयाची भव्य इमारत बार कॉन्सिलच्या सदस्यांना पहावयाची होती. गेल्या सहा महिन्यापासून न्याय व्यवस्था फक्त न्यायाधीश व कर्मचाऱ्यांसाठीच आहे की काय असा प्रश्न आहे. एक लाख पंच्याहत्तर हजार वकिलांना या व्यवस्थेत समाविष्ट केलेलं नव्हते. मात्र बार कॉन्सिलने उच्चन्यायालयाच्या न्याधीशांना खरी परीस्थिचे जाणीव करूनड देत पाठपुरावा केल्याने आता परिस्थिती बदलली आहे. वकिलांनी कामकाजात आता मोठ्याप्रमाणात डिजिटल माध्यमांचा वापर आता सुरु करणे क्रमप्राप्त झाले आहे. डिजिटल माध्यमातून बार किवा घरूनच वकिलांना न्यायालयातील कामकाजात भाग घेता यावा यासाठी

नगरच्या सेन्ट्रल बारच्या पादाधीकारींनी पुढाकार घ्यावा.

          यावेळी बार कॉन्सिलचे सदस्य अॅड. विठ्ठल कोंदे देशमुख, सदस्य अॅड. सुदीप पासबोला यांनीही नगरच्या वकिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. जेष्ठ विधीज्ञ अशोक कोठारी व ए.के. गुगळे यांनी यावेळी वकिलांच्या जागेचा, पार्किंगचा व इतर महत्वाची प्रलंबित प्रश्न मांडली. प्रास्ताविकात सेन्ट्रल बारचे अध्यक्ष अॅड. सुभाष काकडे म्हणाले, नगरच्या इतिहासात प्रथमच बार कॉन्सिलचे अध्यक्षांसह पाच सदस्य जिल्हान्यायालयात आले आहेत. सेन्ट्रल बारच्या वतीने त्यांचे स्वागत करतांना मोठा आनंद होत आहे. सध्याच्या बार कॉन्सिलच्या पादाधीकारीमध्ये नगरचा एकही सदस्य नसल्याने नगरच्या वकिलांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

          कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अॅड. नीलमणी गांधी यांनी केले. आभार अॅड. योगेश काळे यांनी मानले. यावेळी अॅड. सुद्रिक यांनी वकिल सहाय्य निधीसाठी रुपये११ हजाराचा धनादेश अध्यक्षांकडे सुपूर्द केला. यावेळी माजी अध्यक्ष जयंत भापकर, जेष्ठ विधीज्ञ विजय भगत, ॲड. सुरेश लगड, अॅड. वैभव भापकर, ॲड. सौरभ काकडे, अॅड. जरंडीकर आदि उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post