विद्यार्थ्यांनी मनातल्या विचारांना दाबू नका तर त्यांना खतपाणी घालाप्रसिद्ध पटकथा लेखक अमित बैचे

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर – दहावीनंतर शाळेचा पहिला उंबरा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी आकारावीचे वर्ष हे रेस्ट इयर समजू नका. या वर्षात थोडासाही बेजबाबदार पणा केला तर सुधारायला वेळ लागतो. हे वय जरी मज्जा करण्याचे असले तरी आपण आपल्या स्वतःचे शास्त्रज्ञ आहोत हे जाणा. त्यामुळे स्वतःला पडलेल्या प्रश्नांचे उत्तरे स्वतःच शोधून शोधन्याच्या प्रवासास सुरु करा. ज्यावेळी तुमचे मार्ग संपतील त्यावेळेस तुमचे शिक्षक मार्गदर्शक गुरु म्हणून तुमच्या मागे उभे असतात. तर आलेली जवाबदारी पेलण्याची ताकद व पाठबळ महाविद्याल देत असते. त्यामुळे तुम्हाला कोठे जायचे आहे, कशात करियर करायचे आहे हे अकरावीतच ठरवा. मनातले आंदोलने व विचार रुजवण्याचे हे वय आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने मनाचा पाया रचून भविष्याचा प्रवास सुरु करा. मनातल्या विचारांना दाबू नका तर त्यांना खतपाणी घाला. चांगली जाज्वल्य परंपरा असेल्या सारडा महाविद्यालात अकरावीत प्रवेश घेऊन विद्यार्थांनी आपले भविष्य सुरक्षित केले आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध पटकथा लेखक अमित बैचे यांनी केले.

हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या वतीने फेसबुक पेजवर ऑनलाईन व्हर्चुअल कार्यक्रमाचे आयोजन करून इयत्ता ११ वीत नव्याने प्रवेश घेतलेल्या तिन्ही शाखांच्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी पटकथा लेखक अमित बैचे यांनी ऑनलाईन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी हिंदसेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अजित बोरा, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन अॅड. अनंत फडणीस, भाईसथ्था नाईट स्कूलचे चेअरमन डॉ.पारस कोठारी, प्राचार्या डॉ.अमरजा रेखी, उपप्राचार्या डॉ. मंगला भोसले, पर्यावेक्षक डॉ.सुजित कुमावत, प्रबंधक अशोक असेरी आदींसह सर्व प्राध्यापक सामाजिक अंतराने सहभागी होते. सारडा महाविद्यालयात इयत्ता अकरावीत नव्याने प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी व पालक या व्हर्चुअल स्वागत समारंभात फेसबुक द्वारे सहभगी झाले होते.

  संजय जोशी म्हणाले, करोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे केंद्र व राज्य सरकार वेगवेगळे आदेश काढत आहेत. त्यामुळे महाविद्यालय कधी चालू होणार हे अजून सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये यासाठी तातडीने निर्णय घेऊन पेमराज सारडा महाविद्यालयाचे अकरावीचे ऑनलाईन वर्ग सुरु करत आहोत. सारडा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मोठ्यासंख्येने विद्यार्थी अजूनही प्रतिक्षेत आहेत. 

अजित बोरा म्हाणाले, सारडा महाविद्यालाच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी महाविद्यालाचे नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात वाढवले आहे. यावर्षी नुकताच१२ वी चा निकाल एतेहासिक लागला आहे. महाविद्यालायचे विद्यार्थी सर्व परिक्षांमध्ये अव्वल येण्या बरोबरच कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातही मोठे यश मिळवले आहेत.

कार्यक्रमच्या प्रास्ताविकात अॅड. अनंत फडणीस म्हणाले, १९६२ सालापासून पेमराज सारडा महाविद्यालय नगरच्या शैक्षक क्षेत्रात भरीव योगदान देत विद्यार्थ्यांना घडवत आहे. दरवर्षी मोठ्या जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात अकरावीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत या महाविद्यालयात होत असते. मात्र सध्याच्या परिस्थितीचे भान ठेवून उत्साह कमी न करता ऑनलाईन पद्धतीने नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे. सातत्याने हे महाविद्यालय गुणवत्तेत अव्वलस्थानी आहे. येथील प्राध्यापक वर्ग सर्व क्षेत्रासाठी विद्यार्थांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे शहरातील चांगल्या महाविद्यालयात तुम्ही प्रवेश घेतला आहे हे मी अभिमानाने सांगतो.

  प्राचार्या डॉ.अमरजा रेखी यांनी सर्वांचे स्वागत केले. उपप्राचार्या डॉ. मंगला भोसले यांनी आभार मानले,  प्रा. प्रसाद बेडेकर यांनी सुत्रसंचलन केले. 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post