गुड न्युज ; 50 हजार अहमदनगरकर ठणठणीत

 माय अहमदनगर वेब टीम
*अहमदनगर*: जिल्ह्यात आज ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार १९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत २५६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२५६ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ८८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६१ आणि अँटीजेन चाचणीत १०७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४२,अकोले १४, जामखेड ०४, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०१, पारनेर ०२, पाथर्डी ०३, राहाता ०१, श्रीगोंदा १५, कॅंटोन्मेंट ०२  अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ६१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १७, अकोले ०२, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०५, पारनेर ०४, पाथर्डी ०१, राहाता ०६, राहुरी ०५, संगमनेर ०९,  श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १०७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ११, जामखेड ०८, कर्जत १४,  कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०४, पारनेर १०, पाथर्डी २०, शेवगाव ३२, श्रीगोंदा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ६९, अकोले १४, जामखेड २२, कर्जत १३
कोपरगाव १०,नगर ग्रा.२२,नेवासा ०३, पारनेर १५, पाथर्डी ३९, राहाता १९, राहुरी ०८, संगमनेर ०७, शेवगाव १६, श्रीगोंदा ४३, श्रीरामपूर ०६, कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:५००१९*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:२२५६*

*मृत्यू:८०८*

*एकूण रूग्ण संख्या:५३०८३*

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post