तुळ : आपले निर्णय स्वतः घ्या

 


माय अहमदनगर वेब टीम

बुधवार, २३ सप्टेंबर २०२०. दुपारनंतर चंद्र वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रात छाया ग्रह मानले जाणारे राहु व केतु वक्री चलनाने राशीपरिवर्तन करीत आहेत. राहु वृषभ राशीत तर केतु वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून, ज्योतिषीय दृष्टिकोनातून हा राशीबदल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ मिळू शकतील? जाणून घेऊया...

मेष : जोडीदारामुळे आपला लाभ होईल. महत्वाच्या निर्णयात त्यांची मदत घ्या. गरजूंना मदत केल्याचे समाधान प्राप्त होईल. दिवस परोपकारात व्यतीत होईल. कार्यक्षेत्रातील परिवर्तन, बदल वा सुधारणा मन खिन्न करू शकतील. मात्र, सकारात्मक राहून केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करावे. दिवसाच्या उत्तरार्धात कुटुंबातील सदस्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने काही प्रमाणात धावपळ होऊ शकेल. 

वृषभ : खर्चावर नियंत्रण ठेवा. अनाठायी खरेदी टाळा. आजचा दिवस सुखद असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत हास्य-विनोद होतील. दुपारनंतर एखादी शुभवार्ता प्राप्त होऊ शकेल. मात्र, आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. सायंकाळी मित्रांच्या भेटीमुळे वा संवादामुळे मन प्रसन्न होईल. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. सासरच्या मंडळींकडून लाभ मिळण्याचे योग. 

मिथुन : जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. आहारावर नियंत्रण ठेवा. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा आणि वडिलांचे आशीर्वाद यांमुळे एखादी मनोकामना पूर्ण होऊ शकेल. दिनक्रम व्यस्त राहील. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे. वाहन चालवताना योग्य खबरदारी घ्यावी. मनोबल वाढीस लागेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांना उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील.

कर्क : आपल्या जोडीदाराशी सामंजस्याने वागा. छोट्या गोष्टींमधील मदभेत टाळा. धनसंचयात वृद्धी संभवते. आर्थिक स्थिती सुदृढ होऊ शकेल. व्यावसायिक योजनांना गती मिळू शकेल. मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढीस लागेल. मात्र, घाईने आणि भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय भविष्यात समस्याकारक ठरू शकतात. गरजूंना यथाशक्ती मदत करावी. 

सिंह : स्पर्धा परीक्षेमध्ये मोठे यश मिळेल. आत्मविश्वासाला तडा जाऊन देऊ नका. आजचा दिवस सुखमय असेल. राजकीय क्षेत्रात कार्यरत व्यक्तींना लाभदायक दिवस. मुलांप्रतिच्या जबाबदाऱ्या पार पाडाल. स्पर्धेत पुढे राहाल. प्रलंबित येणी प्राप्त होऊ शकतील. व्यवसायिकांना फायदा देणाऱ्या संधी प्राप्त होऊ शकतील. आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील. आहारावर नियंत्रण ठेवावे. दिवसाचा उत्तरार्ध कुटुंबासोबत आनंदात व्यतीत होईल. 

कन्या : मित्र व नातेवाईक यांच्या ओळखीमुळे अनेक लाभ होतील. आपले विचार लोकांसमोर मांडा. तत्परतेने घेतलेले निर्णय आणि केलेली कामे लाभ मिळवून देतील. आप्तेष्टांकडून सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. प्रतिकूल परिस्थिती उद्भवली, तरी रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. दिवसाच्या उत्तरार्धात काही अचानक लाभ संभवतात. 

तुळ : लोकांना आपल्या कामात ढवळाढवळ करून देऊ नका. आपले निर्णय स्वतः घ्या. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम दिवस. स्पर्धा परीक्षेत विशेष यशप्राप्त होण्याची शक्यता. मिळकतीच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. कार्यक्षेत्रात आपल्या वाणीमुळे विशेष सन्मान प्राप्त होऊ शकतील. दिवस धावपळीचा ठरू शकेल. याचा आरोग्यावर विपरीत परिणाम शक्य. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. जोडीदाराचे उत्तम सहकार्य आणि सानिध्य प्राप्त होईल. पर्यटनाच्या योजनांवर चर्चा होऊ शकेल. 

वृश्चिक : घराच्या व्यवहारात फसवणूक करून देऊ नका. माहितगार लोकांना आपल्या विचारात सामील करा. आर्थिक पक्ष मजबूत करणारा दिवस. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. मान, सन्मान, यश, कीर्ती प्राप्त होऊ शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात झालेली मित्राची भेट उपयुक्त ठरू शकेल. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. मात्र, बोलताना तारतम्य बाळगावे. रात्रीच्या प्रहरी फिरायला जायची इच्छा प्रबळ होऊ शकेल. 

धनु : नोकरी व्यवसायात उत्तम संधी लाभेल. अडलेल्या प्रश्नांची अचानक उत्तरे मिळतील. गृहपयोगी वस्तूंची खरेदी शक्य. भौतिक सुखाची साधने वृद्धिंगत होतील. कार्यालयातील सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतील. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल. अन्यथा नुकसान संभवते. मित्रांच्या गाठी-भेटी मन प्रसन्न करतील. विरोधक व हितशत्रू नामोहरम होतील. 

मकर : मित्रांकडून लाभ होतील. दिवसाचा उत्तरार्ध आनंदी जाईल. व्यवसायिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना लाभाच्या उत्तम संधी प्राप्त होतील. आ

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post