आंघोळ केल्यानंतर व करण्यापूर्वी केसांची काळजी घेताना या चुका करणे टाळा

 


माय अहमदनगर वेब टीम

केस घनदाट, लांबसडक, काळेशार आणि सुंदर असावेत… अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण प्रदूषित वातावरण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे केसांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. याव्यतिरिक्त केस स्टायलिश दिसण्यासाठी महिलावर्ग वेगवेगळ्या प्रकारचे हेअर प्रोडक्ट आणि विद्युत उपकरणांचाही मोठ्या प्रमाणात वापर करतात. या सर्व गोष्टींच्या अति वापरामुळे आपल्या केसांचे नुकसान होते. 

तुम्हाला देखील आपल्या केसांची योग्य प्रकारे काळजी घ्यायची असेल तर केसांशी संबंधित छोट्या- छोट्या चुका करणं टाळले पाहिजे. जेणे करून केसांवर कोणतेही परिणाम होणार नाहीत. कोणत्या चुका तुम्ही नियमित करत आहात, ज्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते? जाणून घेऊया यासंदर्भातील माहिती.

केसांसाठी तुम्ही प्लास्टिक ब्रशचा वापर करत असाल तर केसांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. याऐवजी पॅडल ब्रश किंवा बोअर ब्रिसल ब्रशचा वापर करावा. याव्यतिरिक्त हेअर स्टाइल करताना हेअर ब्रशचा काळजीपूर्वक वापर करावा. चुकीच्या पद्धतीने ब्रशचा वापर केल्यास केसांमध्ये नैसर्गिक स्वरुपात असणाऱ्या तेलावर परिणाम होऊ शकतो. हे नुकसान टाळण्यासाठी गुंता सोडवताना केसांची काळजी घ्यावी. हळूवार पद्धतीने केसांचा गुंता सोडवावा, म्हणजे केस तुटणार नाहीत


​नियमित केस धुणे

बहुतांश महिला केस धुताना कित्येक चुका करतात. शॅम्पूने केस धुतल्यानंतर कंडिशनर लावणे आवश्यक असते. जेणेकरून केस मऊ आणि चमकदार राहण्यास मदत मिळते. महत्त्वाचे म्हणजे कंडिशनर कधीही आपल्या टाळूच्या त्वचेवर लावण्याची चूक करू नका. कंडिशनर केसांना लावण्याची योग्य पद्धत तज्ज्ञांकडून जाणून घ्यावी. जर तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुण्याची सवय असल्यास सल्फेट फ्री शॅम्पूचाच वापर करावा.

​ओल्या केसांमध्ये कंगवा फिरवणे

केस ओले असताना कंगवा करणं काही जणांनी अधिक सोयीचे वाटते. पण केस ओले असताना कधीही कंगवा फिरवू नये. कारण कंगव्यामुळे ओल्या केसांमध्ये जास्त प्रमाणात घर्षण निर्माण होऊ शकते. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात केसगळती होण्याची शक्यता असते. केसगळती होऊ नये, यासाठी ओल्या केसांवर सीरम लावा आणि काही वेळासाठी ठेवून द्या. यानंतर केसांमध्ये भांग पाडा आणि हळू-हळू केसांमध्ये कंगवा फिरवा.

​चुकीच्या टॉवेलचा वापर

आंघोळ केल्यानंतर आपण ज्या टॉवेलनं ओलं शरीर पुसतो, त्याचा टॉवेलचा केस कोरडे करण्यासाठीही उपयोग केला जातो. केसांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून ही सवय चांगली नाही. आपण केस पुसण्यासाठी सामान्य टेरीक्लॉथ टॉवेलचा वापर करतो, जे केसांसाठी खूप नुकसानकारक आहे. ओले केस पुसण्यासाठी मायक्रोफायबर पॅटर्न टॉवेलचा वापर कर

​स्टायलिंग टूल्सचा वापर

वेगवेगळ्या स्टायलिश हेअरस्टाइल करण्यासाठी बहुतांश महिलावर्ग ब्लोड्रायर, स्ट्रेटनर इत्यादी स्टायलिंग टूल्सचा वापर करतात. या टूल्सच्या अति वापरामुळे आपले केस कमकुवत होतात आणि त्यावरील नैसर्गिक चमक देखील नाहीशी होऊ लागते. केसांचे नुकसान टाळण्यासाठी या स्टायलिंग टूल्सचा वापरू नये.

​केसांना तेल लावताना होणाऱ्या चुका

काही जण केसांना केवळ वर-वर तेल लावण्याचे काम करतात. टाळूच्या त्वचेकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात. आपल्या केसांचे आरोग्य टाळूच्या त्वचेवर अवलंबून असते, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. टाळूचा मसाज केल्यास त्यावरील मृत त्वचा काढली जाण्यात मदत मिळते. केसांना खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. बोटांच्या मदतीने टाळूचा मसाज करावा, यामुळे रक्त प्रवाह वाढण्यास मदत मिळेल आणि केस मुळासह मजबूत होतील.


​गरम पाण्याने केस धुणे

गरम पाण्याने केस धुतल्यास मोठ्या प्रमाणात फायदे मिळतात असे तुम्हाला वाटत असेल, तर हा समज चुकीचा आहे. गरम पाण्याने केस धुणे टाळावे. गरम पाण्याने केस कोरडे आणि निर्जीव होतात. टाळूच्या त्वचेवरही वाईट परिणाम होतो. गरम पाण्यामुळे केस तसंच टाळूवरील नैसर्गिक तेल नाहीसे होऊ लागते. यामुळे कोरड्या केसांची समस्या निर्माण होऊ लागते. कंडिशनर लावल्यानंतर केस थंड पाण्यानेच धुवावेत, हे देखील कायम लक्षात ठेवा.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post