महापौरांनी लिहिले जिल्हा प्रशासनाला पत्र, म्हणाले....

 

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर- करोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत असताना मयतांची संख्याही वाढत आहे.  त्यामुळे करोना मयतांवरील अंत्यसंस्कारही उशिरा होत असल्याने मयतांच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.  यापार्श्वभूमीवर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जिल्हा रुग्णालयास पत्र लिहून सदर प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 

महापौर वाकळे यांनी म्हटले आहे की, अहम‍दनगर जिल्‍हयात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्‍हा रुग्‍णालयामध्‍ये जिल्‍हयातील कोविड रुग्‍ण उपचार घेत आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात उपचार दरम्‍यान काही रुग्‍णांचे दुर्दवी मृत्‍यू होत आहे. परंतु मृत्‍यू पावलेल्‍या रुग्‍णचा अंत्‍यविधी लवकर होत नाही तसेच ब-याच नागरिकांचे जिल्‍हा रूग्‍णालयाच्‍या कोव्‍हीड रूग्‍णा संदर्भातील कामकाजाबाबत नागरिकांमध्‍ये मोठया प्रमाणात नाराजी आहे. तसेच माझ्याकडे देखील शहरातील व जिल्‍हयातील रूग्‍णांच्‍या नातेवाईक जिल्‍हा रूग्‍णालयातील कामकाजाबाबत व रूग्‍णांना उपचार दरम्‍यान येणा-या अडचणी व रूग्‍ण मृत पावल्‍यास नातेवाईकांना होणा-या मनस्‍तापा बाबत अनेकजण तक्रारी करित आहेत. याबाबत वृत्‍तपत्रामध्‍ये 12 तास मृतदेह शवागारात असल्‍याबाबत बातमी प्रसिध्‍द झाली होती वास्‍तविक पाहता मृतांच्‍या नातेवाईकांना जवळचा माणूस मृत पावल्‍यामुळे मानसिक तणावात असतात. त्‍यातच मृत पावलेल्‍या रुग्‍णाचा अंत्‍यविधी पर्यत होणारा मनस्‍ताप वेगळा. यामुळे नागरिकांमध्‍ये रोष निर्माण होत आहे. मनपाने अंत्‍यविधीकरिता दोन विद्युत दाहिन्‍या कार्यान्‍वीत केलेल्‍या आहेत. त्‍यामुळे अंत्‍यविधीसाठी पूर्वी प्रमाणे वेळ लागत नाही. वृत्‍तपत्रात आलेल्‍या बातमीमुळे जिल्‍हा रूग्‍णालयाचे देखील बदनामी होत आहे. याकामात हलगर्जीपणा होता कामा नये.याबाबत आपण रूग्‍ण मृत पावल्‍यास त्‍या रूग्‍णांचा कार्यालयीन सोपास्‍कार तातडीने करून लवकरात लवकर अंत्‍यविधी होण्‍याच्‍या दृष्टिने कार्यवाही करावी.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post