माजी मंत्री कर्डिले हे सर्वसामान्यांचे नेते : विनोद तावडेमाय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर : भाजप सरकारच्या काळामध्ये माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी-पाथर्डी-नगर मतदारसंघामध्ये विविध विकास कामे मंजूर करुन आणली. प्रत्येक गावामध्ये शासनाचा निधी घेऊन जाण्याचे काम करत आले. कुठलाही राजकीय वारसा नसताना गेली २५ वर्षे नगर जिल्ह्याच्या राजकारणात सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. सर्वसामान्य जनतेच्या बळावर त्यांनी प्रस्थापितांच्या विरोधात निवडणुका लढून जिंकल्या. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कामे झाली. गेली २५ वर्षे जनता दरबाराच्या माध्यमातून प्रश्‍न सोडविण्याचे काम सुरु आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे सर्वसामान्यांचे नेते आहेत, असे प्रतिपादन माजी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.

नगर तालुकयाच्यावतीने माजी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा सत्कार करताना भाजपा जिल्हा युवक सरचिटणीस अक्षय कर्डिले, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, चेअरमन अभिला, घिगे, व्हाईस चेअरमन संतोष म्हस्के, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुरेश सुंबे, हरिभाऊ कर्डिले, रेवन चोभे, बन्सी कराळे, संभाजी पवार, छत्रपती बोरुडे, दीपक कार्ले, राम पानमळकर, दिलीप भालसिंग, बाबासाहेब खर्से, बाळासाहेब कर्डिले, राहुल पानसरे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री कर्डिले म्हणाले की, २५ वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये नगर तालुक्याबरोबरच पाथर्डी, नेवासा व राहुरी तालुक्यामध्ये विविध विकास कामे मंजूर केली. शासनाच्या विविध योजना राबविण्याचे प्रामाणिकपणे काम केले. मागील ५ वर्षात भाजपा सरकारच्या काळामध्ये सर्वात जास्त निधी मतदारसंघामध्ये मिळाला.

त्यामुळे मतदारसंघात आजही मी मंजूर केलेली विकास कामे सुरु आहेत. असे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post