आयपीएलच्या सहा संघांचे प्रायोजकत्व एकाच कंपनीकडे

 

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - कोरोनाच्या महासंकटातही होत असलेल्या आयपीएल 2020 तथा टी-20 लीग सामन्यांच्या मैदानात उतरणार्‍या तब्बल 6 टीमला एकाच कंपनीने प्रायोजकत्व देऊन यंदाच्या आयपीएल सामन्यांचे अर्थकारणच बदलवून टाकले आहे.  मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्ज, दिल्‍ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या सहा संघांना प्रायोजकत्व देण्याची घोषणा बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड तथा बीकेटी टायर्सने केली आहे. 

भारतीय खेळांना प्रोत्साहन देण्याचे धोरण बीकेटीने जाणीवपूर्वक स्वीकारले असून गतवर्षीच्या कबड्डी स्पर्धांच्या हंगामातही प्रो कबड्डी लीग खेळणार्‍या बारापैकी आठ संघांचे प्रायोजकत्व बीकेटीकडेच होते. पाटणा पायरेटस्, पुणेरी पलटन, तामिळ थलयवा, यु मुंबा, गुजरात फॉर्च्युन जायंटस्, युपी योद्धा, दबंग दिल्‍ली आणि हरियाणा स्टीलर्स या संघांसोबत बीकेटी कबड्डीचे सामनेही खेळली. एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरणार्‍या विविध संघांना एकाच कंपनीने प्रायोजकत्व देण्याचा हा आगळावेगळा फॉर्म्युला पुढे येत आहे. संघ कोणताही जिंको, प्रायोजक हरणार नसतो, असे या प्रायोजकाचे सूत्र आहे. आयपीएल सामने यंदा होतील की नाही याची खात्री नव्हती. मात्र जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात होणार्‍या क्रीडा स्पर्धांना आम्ही पाठिंबा देत आलो आहोत. आणि आता तर आयपीएलचे सामने भारतासाठी अत्यंत महत्वाचे असल्याने आम्ही या सामन्यांनाही पाठिंबा देण्याचे ठरवले, असे बीकेटीचे सह व्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post