जमावाने पाठलाग करून सख्ख्या भावांना ठार मारले, 42 जणांविरुद्ध गुन्हा, 16 आरोपी अटकेत


माय अहमदनगर वेब टीम

जालना - पोळ्याच्या दिवशी बैलाचा धक्का लागला म्हणून किरकोळ वाद झाला होता. या कारणावरून शुक्रवारी सकाळी मोठ्या संख्येने आलेल्या जमावाने काठ्या, दगडाने केलेल्या मारहाणीत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. ही घटना जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथे शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. राहुल गौतम बोरुडे, प्रदीप गौतम बोरुडे अशी मृतांची नावे आहेत. तिसऱ्या भावाला याची कुणकुण लागताच त्याने पळ काढल्याने तो बचावला. पोलिसांनी सायंकाळपर्यंत १६ आरोपींना अटक केली आहे.

पोळ्याच्या दिवशी राहुल बोरुडे यांच्या बैलाचा धक्का लागल्यावरून किरकोळ वाद झाला होता. त्या वेळी काही जणांनी तुमचा काटा काढू, अशी धमकी राहुलला दिली होती. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मोठा जमाव राहुलच्या घरावर चालून आला. घरी राहुलची आई, बहीण व एका भावाची पत्नी होती. जमावाने घरात घुसून शिवीगाळ करत प्रदीप व राहुल मारहाण सुरू केली. त्यामुळे ते पळू लागले असता त्यांचा पाठलाग करून काठ्या, दगडांनी ठेचून मारले. एकाचा घटनास्थळी तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी रामेश्वर गौतम बोरुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दगड, काठ्या, तीक्ष्ण हत्याराने केला हल्ला

जमाव मागे लागल्याचे पाहून दोघे भाऊ सैरावैरा धावत होते. जमावाने पाठलाग करून राहुल यास दुसऱ्या गल्लीत नेऊन तेथे दगड, काठ्या, तीक्ष्ण हत्याराने मारल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला, तर प्रदीप याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post