मोबाईल कंपन्याविरोधात थेट पंतप्रधान यांच्याकडे तक्रार



माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर :-नगर तालुक्यात इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या मोबाईल कंपन्या विरोधात नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक कोकाटे यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे तक्रारीमध्ये असे म्हटले आहे आहे नगर तालुक्यातील असणाऱ्या बी, एस, एन,एल, रिलायन्स जिओ, वोडाफोन, आयडिया, एअरटेल या मोबाईल कंपन्यांच्या टॉवरद्वारे नागरिकांना रेंज कनेक्टिव्हिटी सेवा पुरवण्यात येतात परंतु गेल्या पाच ते सहा महिन्यापासून सातत्याने मोबाईल रेंज विस्कळीतपणे पुरवली जाते मोबाईल कंपन्या आपल्या विविध मासिक, त्रिमासिक प्लॅनप्रमाणे ग्राहकांकडून संपूर्ण रक्कम घेतात परंतु या कालावधीमध्ये अनेक वेळा मोबाईल कंपन्यांच्या टॉवरद्वारे देण्यात येणारी रेंज कनेक्टिव्हिटी नसते. कधीकधी तर दोन तासांपासून दहा ते बारा तासांपर्यंत ही कनेक्टिविटी नसते मग या काळातील ग्राहकांकडून प्रिपेड मोबाईल प्लॅनद्वारे वसूल केलेल्या पैशाच्या बदल्यात सेवा पुरवली जात नाही.


ही बाब निश्चितच टेली कम्युनिकेशन सेवा नियमन कायद्याअंतर्गत येणाऱ्या अटी व शर्तींचे उल्लंघन ठरत आहे.या मोबाईल कंपन्यां ग्राहकांच्या तक्रारी स्थानिक पातळीवरती व जिल्हा पातळीवरती फारशा गांभीर्याने घेत नाहीत.


हे वारंवार निदर्शनास आल्यामुळे कोकाटे यांनी थेट पंतप्रधान यांच्याकडे तक्रार केली मोबाईल कंपन्या ग्राहकांकडून संपूर्ण पैसे घेऊन पुर्णवेळ सेवा देत नाहीत. तालुक्यातील मोबाईल टॉवर वरती अवलंबून असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण ग्राहकांना जसे महाविद्यालय, जिल्हा परिषद शाळा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ए.डी.सी.सी.बँक, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा या विस्कळीत सेवेमुळे विपरित परिणाम होतो.परिणामी परिसरातील हजारो नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.


सद्यस्थितीला कोरोना साथीच्या रोगामुळे विद्यार्थ्यांच्या शाळा, क्लासेस बंद आहेत. शाळा, कॉलेज मार्फत ऑनलाईन शिक्षणप्रणाली अवलंबली आहे मोबाईल कंपन्यांच्या टॉवर कनेक्टिविटी नसल्या कारणाने अनेक विद्यार्थ्यांना हे ऑनलाइन शिक्षण घेताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

त्यामुळे येणाऱ्या काळात विध्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होऊ शकते ही बाब गंभीर तर आहेच परंतु ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन करणारी ठरत आहे. यामुळे आदरणीय पंतप्रधान साहेब आपण तात्काळ यामध्ये लक्ष घालावे व त्वरित या मोबाईल कंपन्यांच्या व्यवस्थापनास कार्य पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी कोकाटे यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post