रेल्वे विभागात मेगा भरतीचा मार्ग मोकळामाय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - रेल्वे विभागाकडून विविध प्रकारच्या ३ श्रेणीत रिक्त पदांची भरती करण्याकरिता अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त सर्व अर्जांची तपासणी करण्यात आली असून लवकरच पात्र उमेदवारांची परीक्षा १५ डिसेंबर २०२० पासून घेण्यात येतील, असे रेल्वे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. के. यादव यांनी याविषयी माहिती दिली.

रेल्वेविभागातर्फे १ लाख ४० हजार ६०० पदांसाठी विविध श्रेणींमध्ये भरतीसाठी कोरोना संकट उद्भवण्याच्या आधीच अर्ज मागवण्यात आले होते. यानुसार राष्ट्रीय ट्रान्सपोर्टरला १.४ लाख रिक्त जागांसाठी २.४२ कोटी अर्ज प्राप्त झाले आहेत. या सर्व पदांसाठी डिसेंबर मध्ये परिक्षा होणार आहेत, कोरोना परिस्थिती पाहता या परिक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार असल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे.

सध्या परिक्षांच्या तारखेबाबत घोषणा करताना लवकरच वेळापत्रक सुद्धा जारी करण्यात येईल असे यादव यांनी सांगितले आहे. या परिक्षांच्या माध्यमातून नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी, आयसोलेट अँड मिनिस्ट्रिल श्रेणी तसेच ट्रॅक मेन्टेनन्स श्रेणीच्या पदांवर भरती होणार आहे. दरम्यान, या परिक्षा अर्जांची छाननी केव्हाच आटोपली होती मात्र कोरोनामुळे परिक्षा कशा घ्यायच्या हाच प्रश्न होता, मात्र केंद्र सरकारने जेईई, नीट परिक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यावर रेल्वेने सुद्धा संगणकीय मार्गाने परिक्षांचे वेळापत्रक बनवायला घेतले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post