चीनकडून अमेरिकेतील कोरोना लस डेटा चोरीचे प्रयत्न



माय अहमदनगर वेब टीम
वॉशिंग्टन - अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात कोरोना लसीवर संशोधन सुरू आहे. चीन आणि रशिया या विद्यापीठातील संशोधन आणि त्यातील प्रगतीचा डेटा चोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत, असा इशारा अमेरिकन गुप्‍तचर यंत्रणेने या विद्यापीठाला दिला आणि यंत्रणेने या क्षणापर्यंत तरी चीन आणि रशियाचा कट यशस्वी होऊ दिलेला नाही.

अमेरिकेतील फायझरसह काही कंपन्या व्हॅक्सिन तयार करत आहेत. किती तरी हायटेक प्रयोगशाळांतून व्हॅक्सिनवर संशोधन सुरू आहे. चीन आणि रशियातील गुप्‍तचर यंत्रणा या सर्वच संशोधनांचा डेटा लांबविण्याच्या पुरेपूर प्रयत्नात आहेत. ब्रिटनच्या गुप्‍तचर यंत्रणेने फायबर ऑप्टिकल केबल्सच्या पृथक्‍करणानंतर असाच खुलासा केला होता. इराणही या चोरीच्या कटात सहभागी असल्याचा संशय आहे.
साधारणपणे जगातील प्रत्येक विकसित देशाला इतर देश व्हॅक्सिनच्या प्रगतीत कुठे आहेत, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहेच. त्यासाठी गुप्‍तचर यंत्रणांचा वापर या देशांकडून केला जात आहे. अमेरिकेनेही आपला डेटा चोरी होऊ नये म्हणून जोरदार तयारी केली आहे. ‘नाटो’ची गुप्‍तचर यंत्रणा यात मदत करत आहे. अमेरिकन अधिकार्‍यांना चीनच्या या कटाची माहिती मार्चमध्येच प्राप्‍त झाली होती. चीनच्या या कटात जागतिक आरोग्य संघटनाही सहभागी असल्याचा संशय अमेरिकेला आहे.

‘एफबीआय’ने चीनचे सगळे प्रयत्न हाणून पाडले 

आहेत. सर्व  बायोटेक्नॉलॉजी लॅबना अ‍ॅलर्ट करण्यात आल्याने हे शक्य झाले. ब्रिटनची इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलांस संस्था ‘जीसीएचक्यू’ने रशियाच्या कटाबाबत अमेरिकेला कळवताच अमेरिकेतील अंतर्गत सुरक्षा यंत्रणा आणि ‘एफबीआय’ सतर्क झाल्या, कामाला लागल्या होत्या.

ज्या डेटा चोरीचा कट रचला जातोय, तो डेटा आर्थिक आणि सुरक्षेच्या द‍ृष्टिकोनातून अमूल्य आहे. आम्हाला माहिती आहे, हे काम कोण करतोय. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला रसद पुरवणे बंद केले आहे आणि ही संघटना चीनच्या हातातील बाहुले आहे, असा स्पष्ट आरोपही केला आहे. 
- जॉन डिमर्स, वरिष्ठ अधिकारी, न्याय विभाग, अमेरिका

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post