अर्जुन कपूरनंतर मलायकालाही कोरोनाची लागणमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई - बॉलिवुड अभिनेता अर्जुन कपूरनंतर मलायका अरोराचा  कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मलायका अरोराची बहीण अमृता अरोराने ही माहिती दिली आहे. अर्जुन कपूरने इन्स्टावर पोस्ट लिहून कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अर्जुनने होम क्वारंटाईन असल्याचे म्हटले आहे. अर्जुन कपूरला काही लक्षण नाहीत. मलायकाच्या 'इंडियाज बेस्ट डान्सर्स' च्या शोच्या सेटवरून ७ ते ८ लोक कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे वृत्त आहे.

या अगोदर बॉलिवुड अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चनही कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या कोरोना पॉझिटिव्ह आले होते. ते होम क्वारंटाईन झाले होते. त्यांच्यात कोणतीही लक्षणे नव्हती. 

अर्जुन कपूर कोरोना पॉझिटिव्ह आल्याची बातमी कळताच कलाकारांनी त्याच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करण्यास सुरवात केली. जान्हवी कपूर, सिद्धांत कपूर, हर्षवर्धन कपूर, मुकेश छाब्रा, आयशा श्रॉफ आणि कृती सॅनॉन आदींनी त्याच्या आरोग्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post