राज्याची रुग्णसंख्या दहा लाखांजवळ, मराठवाड्यात 1396 नवे रुग्ण; 28 मृत्यू, औरंगाबादचे 14

माय अहमदनगर वेब टिम

मुुंबई - राज्यातील रुग्णसंख्या ९ लाख ९०,७९५ झाली. गुरुवारी २३,४४६ नवे रुग्ण आढळले. १४,२५३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. राज्यातील मृतांची एकूण संख्या आता २८,२८२ झाली असून सध्या २ लाख ६१,४३२ अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत एकूण ७ लाख ७१५ रुग्ण बरे झाले आहेत.


मराठवाड्यात १,३९६ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून २८ जणांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ४३७ नवे रुग्ण आढळले. १४ मृत्यूंची नोंद झाली. बीड जिल्हा ११०, जालना १३३, नांदेड ३२७, उस्मानाबाद १८२, परभणी १४०, हिंगोली ६७ नवे रुग्ण आढळले असून यामध्ये राज्य राखीव दलातील १९ जवानांचा समावेश आहे. मृतांमध्ये औरंगाबादखालोखाल उस्मानाबाद ५, बीड ४, नांदेड ३, तर जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post