मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. आम्ही अयोध्येत राम जन्मभूमीत थाटामाटात कार्यक्रम करणार आहोत. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिवसेनेच्यावतीने कार्यक्रम करणार आहे असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेचे मोठे योगदान आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला कोणीही विसरू शकत नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी आजच्या भूमिपूजन कार्यक्रमामुळे आनंद झाला असल्याचेही सांगितले. ते म्हणाले, राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हा शासकीय कार्यक्रम आहे. आजचा मुहूर्त महत्त्वाचा आहे. साधुसंतांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या मुहूर्तावर भूमिपूजन होत आहे. आजच्या कार्यक्रमाचं श्रेय कोणीही घेऊ नये. कारण हा शासकीय कार्यक्रम आहे. बाळासाहेबांना आणि शिवसेनेला कोणी विसरु शकत नाही. राम मंदिर उभारणीतील त्यांचे योगदान मोठे आहे. अनेकांचे यात योगदान आहे. घुमट काढताना शिवसैनिकांचं मोठं योगदान आहे.
या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. आम्ही अयोध्येत राम जन्मभूमीत थाटामाटात कार्यक्रम करणार आहोत. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिवसेनेच्यावतीने कार्यक्रम करणार आहे. आजच्या कार्यक्रमाला लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी वयोमानामुळे उपस्थित राहू शकले नाहीत, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.
Post a Comment