नगरात भाजपाला 'या' गोष्टीची आहे सल...


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - येणारे दिवस भाजपसाठी चांगले आहेत. नगर शहरात भाजपने नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, खासदार, राज्य व केंद्रीय मंत्री आदी लोकप्रतिनिधी दिले आहेत. मात्र, शहरात आतापर्यंत भाजपच्या आमदाराला निवडून येता आलेले नाही, ही सल वर्षानुवर्षे भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आहे. शहरात भाजपला आमदारकी मिळवणे अवघड नाही.

राज्यात भविष्यात मध्यवर्ती विधानसभा निवडणुका होऊ शकतात. यात शहरात अनुकूल वातावरण असल्याने भाजपच्या नव्या पदाधिकार्‍यांनी आत्तापासूनच कामाला लागावे. शहराचा पुढील आमदार भाजपचाच होईल अशी महत्त्वाकांक्षा शहर भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी बाळगावी, असे आवाहन पक्षाच्या नेत्यांनी केले.

शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे आणि त्यांच्या नव्या कार्यकारिणीचा नुकताच सत्कार समारंभ झाला. याप्रसंगी पक्षाच्या नेत्यांच्या मनातील शहरातील आमदारकीबाबतची सल समोर आली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रा. मधुसूदन मुळे होते.

यावेळी विकास पाथरकर, एल.जी. गायकवाड यांच्याहस्ते शहरजिल्हाध्यक्ष गंधे, नूतन ग्रामीण जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, शहर संघटन सरचिटणीस अ‍ॅड. विवेक नाईक, उपाध्यक्ष सुधीर पगारिया, सचिन पारखी, संतोष गांधी, शिवाजी दहींडे, सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, युवामोर्चा अध्यक्ष महेश तवले, महिला आघाडी अध्यक्षा अंजली वल्लाकट्टी आदींसह सर्व नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

प्रा. मुळे म्हणाले, देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे तुम्ही पदाधिकारी झालात याचा अभिमान बाळगा. चांगले काम करण्यासाठी ज्येष्ठांच्या विचारावर काम करून, अभ्यास करून काम करा. निश्चित पक्ष याही पेक्षा मोठ्या उंचीवर जाईल.

शहर भाजपची कार्यकारिणी निवडताना सर्वांशी सल्लामसलत करून प्रत्येक घटकाला कार्यकारिणीत स्थान दिले आहे. पक्षात जो चांगले काम करतो त्याच्या कामाची दखल पक्ष कायमच घेत असतो. त्यामुळेच तुम्हाला हे पद मिळाले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र श्रोत्री यांनी केले. आभार विवेक नाईक यांनी मानले. या कार्यक्रमात शहर भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख अमित गटणे, हुझेफा शेख, ओंकार पठाडे, युवामोर्चा सरचिटणीस उमेश साठे, आशिष अनेचा, अमोल निस्ताने, व्यापारी आघाडीचे विलास गांधी, अल्पसंख्याक आघाडीचे जहिरउद्दीन सय्यद, एससी आघाडी राम वडागळे, डॉक्टर आघाडी डॉ. विलास मढीकर, आध्यात्मिक आघाडी प्रद्युम्न जोशी, ज्येष्ठ नागरिक आघाडी अशोक सरनाईक, क्रीडा आघाडी प्रा. संजय धोपावकर, बंटी डापसे, बाळासाहेब खताडे आदींचा सत्कार करण्यात आला.

शहर भाजपची कार्यकारिणी निवडताना सर्वांशी सल्लामसलत करून प्रत्येक घटकाला कार्यकारिणीत स्थान दिले आहे. पक्षात जो चांगले काम करतो, त्याच्या कामाची दखल पक्ष कायमच घेत असतो. त्यामुळेच तुम्हाला हे पद मिळाले असून चांगले काम करा, असा सल्ला नूतन शहराध्यक्ष महेंद्र गंधे यांनी दिला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post