...म्हणून विठ्ठल मंदिर 31 ऑगस्टपर्यंत बंदचमाय अहमदनगर वेब टीम
पंढरपूर - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने 31 ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यात लॉकडाऊन वाढविला असून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही 31 ऑगस्टपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार असल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली.  

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने 31 ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यात लॉकडाऊन वाढविला आहे. राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोलापूर जिल्ह्यात व पंढरपूर शहरातदेखील मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. राज्य शासनाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याअनुषंगाने मंदिरे समितीने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 31 ऑगस्टपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 


 
मात्र, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील लाखो भाविकांच्या भावनेशी संबंधित आहे. त्यामुळे ‘श्रीं’चे नित्योपचार सुरू राहणार आहेत. पहाटे होणारी ‘श्रीं’ची काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोशाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व उपचार, पूजा परंपरेनुसार बजावण्यात येत आहेत. त्याच्या स्वरूपात किंवा पद्धतीत कोणत्याही प्रकारचा खंड न पाडता मंदिरात नित्य म्हणजेच दैनंदिन पूजाअर्चा चालू ठेवण्यात येत आहेत. इतर सणवार, उत्सव परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.

 श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य आ. रामचंद्र कदम, शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, संभाजी शिंदे, आ. सुजितसिंह ठाकूर, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर देशमुख (जळगावकर), अ‍ॅड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ.  ‘भागवतभूषण’ अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, साधना भोसले यांच्याशी विचारविनियम करून एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post