राजसेवा पूर्व परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल

 

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परिक्षेची तारीख बदलली आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही परिक्षा १३ सप्टेबरला होणार होती. आता बदललेल्या तारखेनुसार ही परिक्षा २० सप्टेंबरला होणार आहे. 

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तिसऱ्यांदा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक १७ जून रोजी जाहीर करण्यात आले होते.

या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि  अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबरला होणार होती. तथापि, १३ सप्टेंबरला देशात नीट परीक्षा होणार आहे. त्याच दिवशी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार होती. त्यामुळे एमपीएससीने पुन्हा एकदा परीक्षा पुढे ढकलली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post