पार्थ अपरिपक्व म्हणत पवारांचा नातवावर निशाना

 

माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. तो अपरिपक्व आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी पार्थ यास फटकारले आहे. तर आजोबांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास पार्थ यांनी नकार दिला आहे. सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा असे वाटत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही. चौकशी कोणी करायची हा राज्य सरकार, सीबीआयचा प्रश्न आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तसे पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिले होते. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. हे व्हायला नको होते. पण ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे त्याचे आश्चर्य वाटत आहे. सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मला याबद्दल विचारले. त्यालाही याबद्दल आश्चर्य वाटले. २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तरी त्याची नोंद घेतली जात नाही, असे पवार यांनी सांगितले. मुंबईत शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक झाली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post