सैफ-करिनाच्या घरात दुस-यांदा पाळणा हलणार!


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई - बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या कुटुंबात लवकरच नव्या लहान पाहुण्याचे आगमन होणार आहे. करिना कपूर प्रेग्नंट असल्याबाबतचे वृत्त सोशल मीडियावर काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. मात्र आता सैफने स्वत: अधिकृतरित्या या वृत्ताबाबत खुलासा केला आहे. 

सैफ म्हणतो की, करिना व मी खुश आहे. आमच्या कुटुंबात नव्या लहान पाहुण्याचे आगमन होणार आहे. आम्हा दोघांवर प्रेम करणा-या चाहत्यांचे व शुभचिंतकांचे खूप खूप धन्यवाद. 

ऑक्टोबर २०१२ मध्ये सैफ-करीनाने लग्नगाठ बांधली. त्यानंतर २०१६ मध्ये करीनाने तैमुरला जन्म दिला. तैमुर तीन वर्षांचा असून सोशल मीडियावर त्याचे बरेच फोटो व व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर करीना व सैफ अली खानवर शुभेच्छांचा जोरदार वर्षाव होत आहे.

करीना कपूर खान सैफ अली खानची दुसरी पत्नी आहे. अमृता सिंग ही सैफची पहिली पत्नी होती. त्यांचा घटस्फोट झाला असून त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन अपत्य आहेत. तर सैफ व करीना कपूर दांपत्याला तैमूर हा मुलगा आहे. आता तैमूर अली खानला एक भाऊ किंवा एक बहीण मिळणार आहे. परंतु, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. सैफ-करीनाच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच चांगली बातमी आहे.

आज सैफची पहिली मुलगी सारा अली खानचा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी त्याने जाहीर केले आहे की करीना दुस-यांदा पेग्नंट आहे. सोशल मीडियाबद्दल बोलायचे झाल्यास फक्त करीना इन्स्टाग्राम ॲक्टीव्ह आहे. सैफ कोणत्याही सोशल मीडिया पोर्टलवर नाही. चाहत्यांनी करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन करण्यास सुरवात केली आ

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post