साधा संधी! एसएसबी कॉन्स्टेबल भरती २०२० प्रक्रिया सुरु; ७० हजारांपर्यंत पगार

 

माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्रालयाने सशस्त्र सीमा बाल (एसएसबी) मधील कॉन्स्टेबल पदासाठी अनेक वेगवेगळ्या पोस्टसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. २८ जुलैपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

खालीलप्रमाणे पदे भरण्यात येणार आहेत. 

कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पुरुष - 574 पदे

कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) - 24 पदे

कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) - 161 पदे

कॉन्स्टेबल ( आया) महिला - 05 पदे

कॉन्स्टेबल (सुतार) - 03 पदे

कॉन्स्टेबल (प्लंबर) - 01 पद

कॉन्स्टेबल (पेंटर) - 12 पदे.

कॉन्स्टेबल (टेलर) - 20 पदे

कॉन्स्टेबल (कॉब्लर) - 20 पदे

कॉन्स्टेबल (गार्डनर) - 09 पदे

कॉन्स्टेबल (कुक) पुरुष - 232 पदे

कॉन्स्टेबल (कुक) महिला - 26 पदे

कॉन्स्टेबल (वॉशरमन) पुरुष - 92 पदे

कॉन्स्टेबल (वॉशरमन) महिला - 28 पदे

कॉन्स्टेबल  (बार्बर) पुरुष - 75 पदे

कॉन्स्टेबल (बार्बर) महिला - 12 पदे

कॉन्स्टेबल (सफाईवाला) पुरुष - 89 पदे

कॉन्स्टेबल (सफाईवाला) महिला - 28 पदे

कॉन्स्टेबल (पाणी वाहक) पुरुष - 101 पदे

कॉन्स्टेबल  (पाणी वाहक) महिला - 12 पदे

कॉन्स्टेबल (वेटर) पुरुष - 01 पद 

एकूण पोस्टची संख्या - 1522


वेतनमान - स्तर 3


21,700 रुपये दरमहा ते 69,100 रुपये दरमहा


अर्ज माहिती


या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 28 जुलै 2020 पासून सुरू झाली आहे. उमेदवार अर्ज सुरू होण्याच्या तारखेपासून 30 दिवसांपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.


सर्वसाधारण, ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी अर्ज फी 100 रुपये आहे. इतर सर्व श्रेणी आणि महिला उमेदवारांसाठी हा अर्ज विनामूल्य आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा ई-चालानद्वारे अर्ज फी भरा


आवश्यक पात्रता


वेगवेगळ्या पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता मागविण्यात आल्या आहेत. किमान आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा देखील पोस्टनुसार बदलते. या सूचनेवरून आपल्याला सविस्तर माहिती मिळू शकेल.

निवड प्रक्रिया - पात्र उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि ट्रेड टेस्टच्या आधारे केली जाईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post