संकट काळात तात्काळ फोन करा - आ. संग्राम जगताप यांचे आवाहन


माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर -

शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने रुग्णालयातील बेड कमी पडू लागले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल होताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. बेड मिळण्यासाठी अनेक रुग्णालयांकडे चकरा माराव्या लागत आहेत. याशिवाय शहरात कुठे कोविड केअर सेंटर आहे व कोठे इतर आजारांवरील उपचार सुविधा सुरू आहे, याची माहिती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नागरिकांनी या कोरोना संकटाच्या काळात योग्य माहिती व मार्गदर्शन मिळावे, यासाठी त्यांनी मला विनासंकोच संपर्क करावा, असे आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी आवाहन केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post