देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात

 

माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - देशाचे माजी राष्ट्रपती अजूनही व्हेंटिलेटरवर असून ते दीर्घ कोमात असल्याची माहिती लष्कराच्या आर अँड आर रुग्णालयाकडून गुरुवारी देण्यात आली. दरम्यान, सोशल मीडियावर मुखर्जी यांच्या मृत्यूची अफवा पसरविली जात असून असे कृत्य करू नये, असे आवाहन त्यांच्या कुटुंबियांनी केले आहे. 

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना गेल्या सोमवारी आर अँड आर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच्या काही वेळेपूर्वीच स्वतः मुखर्जी यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाली असून गेल्या आठवड्यात जे जे संपर्कात आले होते त्यांनी स्वतःला विलग करावे तसेच कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे सांगितले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मुखर्जी यांच्या मेंदुत रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले होते, त्यानंतर जमलेले रक्त काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 

प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अजूनही चिंताजनकच आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत चुकीचे वृत्त पसरल्यानंतर प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. प्रणव मुखर्जी यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर चिंताजनक वृत्त पसरवले जात आहे. हे वृत्त खोटे असल्याचे अभिजीत मुखर्जी यांनी म्हटले आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या संदर्भात सोशल मीडियावर #ripPranabMukherjee असा ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडवर प्रतिक्रिया देत अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती दिली आहे. 

काय म्हटले आहे अभिजीत मुखर्जी यांनी ट्विटमध्ये? 


माझे वडील प्रणव मुखर्जी अजूनही जिवंत आहेत. हेमोडाइनेमिकली स्थिर आहे. काही माध्यमांकडून सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत.


 तसेच, तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेमुळे माझ्या वडिलांची सध्या प्रकृती स्थिर आहे. मी सर्वांना विनंती करतो की, माझ्या वडिलांची प्रकृती लवकरात लवकर ठीक होण्यासाठी  सर्वांनी प्रार्थना सुरू ठेवावी, असे भावनिक आवाहन देखील अभिजीत मुखर्जी यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे. 




मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्यानंतर मुखर्जी यांच्यावर ब्रेन सर्जरी करण्यात आली होती. ऑपरेशन झाल्यापासून मुखर्जी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. प्रणव मुखर्जी यांना गेल्या सोमवारी दुपारी आर अँड आर रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. तत्पुर्वी आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती स्वतः मुखर्जी यांनी सोशल मीडियावरून दिली होती. मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी मुखर्जी यांच्यावर ब्रेन सर्जरी केली होती. व्हेंटिलेटरवर गंभीर स्थितीत असलेल्या मुखर्जी यांच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post