गणेशोत्सव, मोहरम व स्वातंत्र्यदिन साध्या पद्धतीने घरातूनच साजरा करावे : माजी मंत्री दिलीप गांधी

 

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर – नगर जिल्ह्यात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत असल्याने नागरिकांच्या बचावासाठी तातडीने  नियंत्रणात आणणे अत्यावश्यक आहे. यासाठी विविध उपाय योजना राबवण्या बरोबरच  जिल्हा प्रशासनाने दिल्लीच्या शासनाच्या धर्तीवर कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यास सुरवात करावी. त्यामुळे गंभीर असलेल्या रुग्णांनासाठी रुग्णालयात त्वरित जागा उपलब्ध होईल.  सर्वसामान्य नागरिकही आता  मोठ्या संख्येने करोना बाधित होत आहेत. त्यांना खाजगी मोठ्या रुग्णालयात उपचार परवडत नसल्याने जिल्हा प्रशासनाने जास्तीतजास्त करोना रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजने अंतर्गत मोफत उपचार करावेत. या योजनांचा जास्तीजास्त लाभ सर्वसामान्य नागरिकांना द्यावा. नागरिकांनी जिल्हा प्रशासनास संपूर्ण सहकार्य करून सर्व नियमांचे पालन करून स्वतःसह कुटुंबातील सदस्यांचा करोना पासून संरक्षण करावे. येणाऱ्या दिवसत गणेशोत्सव, मोहरम सारखे महत्वाचे व मोठे सण येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी यावर्षी हे सण साध्या पद्धतीने घरात बसूनच साजरे करावीत. तसेच भारताचा स्वातंत्र्यदिनही सध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी केले आहे. 

नगर शहरात करोना रुग्णांना बुध हॉस्पिटल वरदान ठरत आहे. तेथील डॉक्टर व कर्मचारी जीवाची पर्वा न करता रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र मनपाने बूथ हॉस्पिटलला सर्वतोपरी सहकार्य करावे. महानगरपालिकेला विविध स्वयंसेवी संस्था या मदत कार्यात मदत करत आहेत. त्यांचेही मानधन त्वरित देण्यात यावे. अशी मागणी दिलीप गांधी यांनी मनापा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या कडे केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post