व्हर्च्युअल वन नेशन रनचे रविवारी आयोजन

 माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर- महामारीचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी तंदुरुस्तीशिवाय पर्याय नसून, आरोग्याचा जागर करीत टाऊनस्क्रिप्ट, नगर रायझिंग फाऊंडेशनच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यासाठी रविवार 16 ऑगस्ट रोजी व्हर्च्युअल वन नेशन रनचे आयोजन करण्यात आले आहे. संपुर्ण देशात मॅरेथॉन आयोजन करणारे विविध स्वयंसेवी संघटनांच्यावतीने हा व्हर्च्युअल रन एकाच दिवशी होणार असून, रनर आहे त्या ठिकाणाहून धावू शकणार आहे. सहभागी रन झाल्यानंतर प्रत्येक धावपटू स्वच्छेने प्रत्येक कि.मी. मागे 5 रुपये नॅशनल डिफेन्स फंडसाठी मदत देणार आहे.


या नॅशनल रनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नगर रायझिंगचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, संदीप जोशी, डॉ. श्याम तारडे, डॉ.सतीश सोनवणे, अ‍ॅड. गौरव मिरीकर तसेच नगर रायझिंग रनर्स क्लबच्यावतीने करण्यात आले आहे. रविवारी सकाळी 6 नंतर रनर्सला दिवसभरात वन नेशन रनमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे. यामध्ये रनर्स टेरेस, घरात अथवा मोकळ्या जागेत इच्छेनुसार फिजीकल डिस्टन्सचे पालन करुन धावू शकतात. यामध्ये 2, 10, 16, 21, 42 व 50 कि.मी. पर्यंतच्या गटात सहभागी होता येणार आहे. या रनसाठी डॉ. शाम तारडे, डॉ. महेश मुळे, डॉ. पांडूरंग सानप, जगदीप मक्कर, सीए अजय गांधी, चैताली गांधी, अमिता बोथरा, कविता शेखावत, प्राची पवार, अंध रनर प्रतिक्षा काळे, अभिनंदन भन्साळी, चेतन नवलानी, किशोर टकले, गोविंद मालू, संजय शेळके, सुयश बूरा, शरद काळे, दिनेश संकलेचा, विलास भोजणे नगर जिल्ह्याचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आहेत.


कोरोना विषाणूच्या महामारीमुळे धावण्याच्या सर्व शर्यती थांबल्या आहेत. रनर्सला प्रेरक आणि सक्रिय ठेवण्यासाठी तसेच नॅशनल डिफेन्ससाठी निधी जमा करण्यासाठी या रनचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या महामारीत तंदुरुस्तीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे महत्त्वाचे असल्याने सर्व नागरिकांना आरोग्यासाठी व्यायामाचे आवाहन करीत रनर्स फिजीकल डिस्टन्सचे पालन करुन धावणार असल्याचे आयोजकांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. व्हर्च्युअल रनसाठी नांव नोंदणी आवश्यक असून, 8975753604 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post