सरकारी नोकरीसाठी एकच सामायिक परीक्षा




 माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - सरकारी नोकरीसाठी आता एकच सामायिक परीक्षा घेतली जाणार आहे. कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय भरती संस्थेत एकदा नोंदणी केली की एकच परीक्षा देऊन युवकांना आपली योग्यता सिद्धता करावी लागेल. नोकरीसाठी दारोदारी परीक्षा देत भटकण्याची वेळ युवा पिढीवर येणार नाही.

प्रकाश जावेडकर म्हणाले, युवकांना जागोजागी परीक्षा देण्यासाठी जावं लागू नये म्हणून एकच कॉमन इलिजिबिटी टेस्ट असेल. यात गुणवत्ता सिद्ध करुन उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल. 

दरम्यान एकच सामायिक परीक्षा देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल. शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी युवा पिढी अनेक मार्गाचा अवलंब करते. प्रत्येक संस्था आणि कंपन्या आपल्या परीक्षा ठेवतात. नोकरीच्या महत्त्वाकांक्षेच्या दृष्टीने या सगळ्या परीक्षा देतात. मात्र मोदी सरकारच्या निर्णयामुळे हे चित्र बदलण्याची चिन्हं आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post