मिरवणूकीला परवानगी नाही


 माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर -  कोरोना संसर्गामुळे मोहरम आणि गणेशोत्सवातील उत्साहावर विरजन पडले आहे. ससंर्गाने पसरणार्‍या या आजारामुळे उत्सवावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. केंद्र व राज्य सरकारने या दोन्ही उत्सवातील मिरवणुकांना परवानगी नाकारल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने अहमदनगर शहरातील मोहरम यंग पार्ट्या आणि गणेश मंडळांच्या मिरवणुकांना परवानगी नाकारत सामाजिक उपक्रम हाती घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी आज पोलीस मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीला पदाधिकार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी संवाद साधला. कोरोना संसर्गामुळे मोहरममधील धार्मिक कार्यक्रमांना परवानी देता येणार नाही. कत्तलच्या रात्रीचे देखील कार्यक्रम देखील परवानगी नसणार आहे. त्याचप्रमाणे मातम घरीच करावेत. सोसायटीमधील नागरिकांनी एकत्र येवू नये. मजलीसचे कार्यक्रम ऑनलाईनपद्धतीने घ्यावेत. चादर मिरवणुका काढू नयेत. घरीच बसवून त्याचे विसर्जन करावेे. ताबूत बांधण्यासाठी दोन व्यक्तींना परवानगी असणार आहे, आदी नियम यावेळी समजावून सांगण्यात आले. नियमाची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे.

त्याचप्रमाणे गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांना देखील गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. मिरवणुका न काढता, मंडप न घालता घरच्या घरीच बाप्पांची मूर्ती स्थापन करण्याची सूचना यावेळी करण्यात आल्या. या दोन्ही समाजातील कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका बोलून दाखवली. अतिरीक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, आयुक्त श्रीकांत मायकलवार, महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post