तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार ; जाणून घ्या हे खास


 माय अहमदनगर वेब टीम

सोमवार, 24 ऑगस्ट 2020 रोजी स्वाती नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग जुळून येत आहेत. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : आकाशी | अंक : १

कार्यक्षेत्रात स्पर्धा अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. आज चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे हिताचे राहील.

वृषभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८

आज तुम्ही आपल्या मर्यादा ओळखून वागणेच हिताचे राहील. कुणी केलेल्या खोट्या स्तुतीने भारावून जाऊ नका. आज स्वत:च्या सुरक्षिततेस प्राधान्य द्या.

मिथुन : शुभ रंग : गुलाबी|अंक : ९

अथक प्रयत्नांच्या जोरावर आज तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरू राहील. महत्त्वाच्या वाटाघाटी, विवाह विषयी चर्चेसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

कर्क : शुभ रंग : पिस्ता|अंक : ७

आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका.कोणतेही निर्णय उताविळपणे घेणे योग्य ठरणार नाही.

सिंह : शुभ रंग : पांढरा|अंक : ५

आज बऱ्याच दिवसांनी तुम्हाला अपेक्षित असलेली प्रिय व्यक्ती अचानक संपर्कात येण्याची दाट शक्यता आहे.

कन्या : शुभ रंग : जांभळा|अंक : ४

अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य द्या. आज मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावेे लागेल.

तूळ : शुभ रंग : निळा | अंक : ३

वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना थकवा जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी नमते घ्यावे लागेल.

वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : २

आज हातात पैसा राहील. आवडत्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. घराबाहेर शब्द जपून वापरा.

धनू : शुभ रंग : नारिंगी | अंक : ४

रिकामटेकड्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता आहे. समोरच्या व्यक्तीस मूर्ख समजण्याची चूक करू नका.

मकर : शुभ रंग : पिवळा | अंक : १

अनपेक्षित मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते. वडीलधाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

कुंभ : शुभ रंग : हिरवा | अंक : १

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही आज तुम्ही भारावून जाल.

मीन : शुभ रंग : तांबडा | अंक : ९

आज वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. व्यवसायात भिडस्तपणास लगाम घालणे गरजेचे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post