पंतप्रधान मोदी शक्तिशाली नेते; अभिनेत्री कंगना राणौतचे ट्विट

 


माय अहमदनगर वेब टीम

मुंबई  - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सुरुवातीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थन करत आहे. ती अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना दिसली आहे. आता कंगना राणौतने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पंतप्रधान मोदींना सर्वात शक्तिशाली नेते म्हटले आहे. तसेच, फोटो शेअर करत कंगना राणौतने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे.

कंगना राणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक शानदार फोटो शेअर केला आहे. तसेच, पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘निश्चितच, पृथ्वीवरील सर्वात शक्तीशाली व्यक्ती आणि तरीही इतके नम्र’. दरम्यान, कंगना राणौतने पंतप्रधान मोदींचे कौतुक करण्याची ही पहिली वेळ नाही. अनेक मुलाखतीमध्ये कंगना राणौतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदर आणि समर्थन व्यक्त केले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी कंगना राणौतच्या राजकारणाशी संबंधित असलेल्या पोस्टमुळे ती राजकारणात उतरणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, या अफवांचे खंडन करीत आपल्याला सर्वाधिक अभिनयाची आवड असल्याचे कंगना राणौतने स्पष्ट केले होते. कंगना राणौतने ट्विट केले होते, ‘मला राजकारणात भाग घ्यायचा आहे म्हणून मी मोदींना समर्थन देते, असे काही लोक समजतात. मात्र, त्यांना मी स्पष्टपणे सांगते की, माझे आजोबा १५ वर्षे काँग्रेसचे आमदार होते. माझे कुटुंब नेहमीच राजकारणाशी संबंधित आहे आणि मला गँगस्टर चित्रपटापासून दरवर्षी काँग्रेसकडून ऑफर येत आहे.’

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post