सुशांत सिंह राजपूत नंतर आणखी एका अभिनेत्याची आत्महत्या

माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मुंबईतील टीव्ही अभिनेता व मॉडेल समीर शर्मा याने मालाड इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरण ताजे असताना आज ४४ वर्षीय समीरने आत्महत्या केल्याने चित्रपट सृष्टीत खळबळ उडाली आहे.

मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईट ड्युटीवर असलेल्या इमारतीच्या वॉचमनने आधी समीरचा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्याने पोलिसांना व सोसायटीच्या सदस्यांना याविषयीची माहिती दिली. समीरने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र समीरच्या घरातून कोणतीच सुसाईड नोट मिळालेली नाही. पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास मालाड पोलिस करीत आहे.

‘ज्योती’, ‘कहानी घर घर की’, ‘लेफ्ट राइट लेफ्ट’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकांखेरीज समीरने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post