मॉस्को - सध्या अमेरिका, रशिया, ब्रिटन, भारतासह अनेक देशांतून कोरोनावर लस तयार करण्यासाठी दिवसरात्र एक केले गेले आहेत. एकीकडे, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीने तिसर्या टप्प्यातील चाचणीला सुरुवातही केली आहे. अमेरिकेतील मॉडर्नाची लसही या दिशेने पुढे आहे. प्रत्यक्षात मात्र रशियाने या सर्वांवर कडी केली असून, या देशाने 12 ते 14 ऑगस्टदरम्यान सार्वजनिक लसीकरण सुरू होईल, अशा बेताने तयारी चालविली आहे.
रशियाकडून रशियात 3 कोटी डोस तयार केले जात आहेत. 17 कोटी डोस परदेशात बनविण्याचा रशियाचा मानस आहे. ‘रशिया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड’चे प्रमुख किरिल दिमित्रीव्ह यांनी सांगितले की, एका महिन्यासाठी 38 लोकांवरील पहिली चाचणीही या आठवड्यात पूर्ण झाली. लस सुरक्षित आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी आहे, हे निष्पन्न झाले आहे. आता तिसर्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. रशिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीतील हजारो लोक यात स्वयंसेवक म्हणून सहभागी होत आहेत. सप्टेंबरअखेरपर्यंत रशियाने पुरेसे डोस तयार केलेले असतील, असे गॅमलेई सेंटरचे प्रमुख अॅलेक्झेंडर गिंट्झबर्ग यांनी सांगितले. 12 ते 14 ऑगस्टदरम्यान लसीचे वितरण सुरू होईल, अशीही त्यांची अपेक्षा आहे.
Post a Comment