मुंबईकरांना दिलासा ; बुधवारपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - लॉकडाउनमध्ये मुंबईकरांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. मिश
न बिगीन अगेन अंतर्गत मुंबईतील सर्व दुकांनाना 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे दुकाने उघडण्याची वेळ यापूर्वी कमी होती. यासोबतच ऑड इव्हन तत्त्वावर ही दुकाने उघडली जात होती. पण, आता 5 ऑगस्टपासून मुंबईतली सर्व दुकाने खुली राहतील.

मुंबई महापालिकेने जारी केलेल्या निर्देशांनुसार, मिशन बिगीन अंतर्गत मुंबईतील सर्व दुकाने सकाळी 9 ते 7 पर्यंत खुली ठेवता येतील. तसेच दारुची दुकानही सुरू केली जाणार आहे. त्यानुसार काऊंटरवर दारू मिळेल. यादरम्यान सर्व गाईडलाईन्सचे पालन करणे गरजेचे आहे. दुकानांसोबतच 5 ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सलाही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यानुसार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरू ठेवता येतील. परंतू, यावेळी मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील सिनेमागृह, फूड कोर्ट आणि रेस्तरॉ बंदच राहतील. परंतू, होम डिलीव्हरी सुरू ठेवता येईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post