देशात आजही 'या' मंदिरांमध्ये महिलांना नो एन्ट्री!


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशाच्या राज्यघटनेप्रमाणे मंदिरातही प्रत्येकासाठी समान प्रवेशाची परवानगी आहे. कारण देवाच्या मंदिरात सर्व समान आहेत, परंतु भारतात अजुनही अशी अनेक मंदिरे आहेत जिथे प्रवेशास लिंगभेद आहे. अशी काही मंदिरे आहेत जिथे १५ ते ५० वयोगटातील स्त्रियांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. त्यापैकी सबरीवाला हे एकमेव मंदिर नाही जिथे अजूनही महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे, परंतु अशी आणखी काही मंदिरे आहेत जिथे महिला केवळ बाहेरूनच दर्शन घेऊ शकतात.

केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिर हे देशातील सर्वांत अमर मंदिर आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या मंदिराला भेट देण्यासाठी येतात. असे म्हणतात की या ठिकाणी भगवान विष्णूंची पहिल्यांदा मूर्ती प्राप्त झाली होती. येथे महिला विष्णूची पूजा करू शकतात, पण मंदिराऱ्या गाभाऱ्यात प्रवेश करू शकत नाहीत. येथे महिलांसाठी तसेच पुरुषांसाठीही ड्रेस कोड आहे.

मध्य प्रदेशमधील गुना येथील जैन मंदिरात महिला किंवा मुलींना पाश्चात्य वस्त्र परिधान तसेच मेकअपशिवाय प्रवेश करु शकत नाहीत. या मंदिराचे नाव श्री शांतिनाथ दिगंबर जैन आहे. हे मंदिर १२३६ मध्ये बांधले होते. जैन तीर्थंकर मूर्ती मंदिरात लाल दगडाने बनविलेल्या आहेत. या मंदिरातील मुख्य देव भगवान शांतीनाथ आहेत.

राजस्थानच्या पुष्कर स्थित कार्तिकेय मंदिरातही महिलांना प्रवेश दिला जात नाही. येथे भगवान कार्तिकेयांची ब्रम्हचारी स्वरूपात पूजा केली जाते. असे मानले जाते की, ब्रह्मचारी असल्यामुळे, एखादी स्त्री दर्शनाला गेली तर तिला शाप दिला जातो. त्यामुळे स्वत: कोणतीही महिला या मंदिरात जात नाही.

सुप्रिम कोर्टाने सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याची परवानगी दिली होती, पण आजही या मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही. या मंदिरात १० ते ५० वर्षापर्यंत महिलांना प्रवेश दिला जात नाही. या मंदिराचे दरवाजे १४ जानेवारी व १५ नोव्हेंबरला उघडले जातात. दर वर्षी लाखो लोक डोंगर चढून मंदिरात अनवाणी पायांनी येतात व ४१ दिवस उपवास करतात.

छत्तीसगढमधील बालोदाबाजार जिल्ह्यात माता मावलीचे मंदिर आहे. हे मंदिर केवळ देशातच नव्हे तर परदेशातही खूप प्रसिद्ध आहे. माता आदिशक्तीच्या या मंदिरात प्रवेश करण्यास स्त्रियांना बंदी आहे. ४०० वर्ष जुन्या या मंदिरात केवळ पुरुषच दर्शन घेऊ शकतात.

हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर मध्ये बाबा बालकनाथ मंदिरात अगोदर महिलांना प्रवेश होता. पण आता प्रवेश नाही, तरीही श्रद्धेमुळे, आजही महिला बाबांच्या गुहेच्या बाहेर दर्शन घेत असल्याचे दिसतात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post