कोरोना नष्ट होणे अशक्य; WHO ने दिली धोक्याची सूचनामाय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली -गेल्या काही दिवसांपासून जगाला कोरोना महामारीने मगरमिठी मारली आहे. भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मृतांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याची सूचना दिली आहे. कोरोना व्हायरस पुर्णपणे नष्ट होणे हे अशक्य गोष्ट असल्याचे WHO च्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. माईक रेयान यांनी म्हटले आहे.

एका मुलाखती दरम्यान डॉक्टर रेयान म्हणाले, की सध्याची स्थिती पाहता कोरोना लवकर नष्ट होईल असे वाटत नाही. जगाला कोरोनासोबत जगण्याची सवय करायला हवी. कारण अद्याप एचआयव्ही हा देखील रोग नष्ट झालेला नाही. दोन्ही रोगांची तुलना आपण करू शकत नाही. पण वास्तवता समजून घेतली पाहिजे. कोरोना कधी जावू शकतो याचा कोणीही अंदाज लावू  शकत नाही.

रोज नवे संक्रमितांच्या बाबी समोर येत आहे. यातच लॉकडाऊन हटवले तर कोरोना महामारीची दुसरी लाट येईल. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. जेव्हा संक्रमितांचा दर कमी होईल आणि कोरोनामुक्तीच्या दरात वाढ होईल. त्याचवेळी लॉकडाऊन पुर्णपणे हटवणे शक्य होईल, असे मत डॉ. रेयान यांनी यावेळी व्यक्त केले.

तसेच, कोरोना महामारीवर लस आल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार नाही. गोवर सारख्या आजारांना लसी दिली जाते. मात्र, अद्याप हा रोग संपलेला नाही. सध्या जगात १०० हून अधिक लसीवर प्रयोग सुरू आहेत. परंतु ही लस प्रभावी असावी, जेणेकरून सर्वांसाठी ती सहज उपलब्ध होऊ शकेल, असे डॉ. रेयान म्हणाले.

आयर्लंडसह अनेक देशांनी कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवले आहे. पण संक्रमणाचा धोका कमी झालेला नाही. WHO तील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शतकातून एकदा येत असलेल्या या माहामारीचा वेग प्रचंड वाढत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनावर अद्याप नियंत्रण मिळालेले नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post