हा निर्णय घेणारा महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळ्या शाळा (School Channel ) बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी यु ट्यूब चॅनेल सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. सोबतच आता इयत्ता 3 री ते इयत्ता 12 वी साठी जिओ टी.व्हीवर jio tv एकूण 12नवीन चॅनल्स सुरु करण्यात आले असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने वेगाने पावलं उचलत आता विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही तसेच विद्यार्थांना या काळात देखील घरबसल्या शिक्षण घेता यावं यासाठी वेगाने पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. मराठी आणि उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी युट्यूब चॅनेल (YouTube Channel) सुरू होणार आहे. यासोबतच लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी देखील युट्यूब चॅनेल सुरू होणार असल्याची देखील माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post