भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे खेड्यात विकासगंगा



माय अहमदनगर वेब टीम
कोपरगाव - मागील सरकारच्या काळात ग्रामविकासाचा निधी थेट ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय घेतल्यामुळे गाव खेड्यांपर्यंत विकासाची गंगा आली आणि त्यामुळेच खर्‍या अर्थाने खेडी समृध्द होत असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.

तालुक्यातील खोपडी येथे सन 2018-2019 च्या ग्रामविकास विकास निधी अंतर्गत उभारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचेे लोकार्पण सौ. कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून करण्यात आलेल्या कार्यक्रमास उत्तर नगर जिल्हा उपप्रमुख प्रमोद लबडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, सरपंच संभाजी नवले, मोहनराव जाधव आदी उपस्थित होते.

सौ कोल्हे म्हणाल्या, मतदार संघातील अनेक आव्हाने घेऊन मी गेली पाच वर्षे मतदार संघाचा विकास करण्याचे काम हाती घेतले. अनेक समाजहिताच्या कामांना प्राधान्य दिल्यामुळेच खेड्यापर्यंतची रस्ते करता आली. रस्त्यांमुळे दळणवळण सुरळीत होउन खेडी शहराला जोडली गेल्याने गावागावात सुबत्तता आली.

खोपडी येथील खंडोबा मंदिरासमोर सामाजिक सभागृहाचे कामासाठी 10 लाखाचा निधी देऊन सदरचे काम पुर्ण करता आल्याचे समाधान असून या गावासाठी धोत्रे ते खोपडी या सुमारे पाच किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 71 लाख रूपये, स्मशानभूमी बैठक शेडच्या कामासाठी 4 लाख, संरक्षक भिंत, दहन शेड व पेव्हिंग ब्लॉकच्या कामासाठी 10 लाख देता आला.

त्याचप्रमाणे राप्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी 46 लाख 60 हजाराचा निधी मंजूर करता आला. या योजनेचेही काम प्रगतीपथावर आहे. सध्या करोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्वांनी काळजी घेण्याची आवष्यकता असून आपल्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहनही सौ. कोल्हे यांनी केले.

उत्तर जिल्हा उपप्रमुख प्रमोद लबडे म्हणाले, सध्या करोना आजाराचा प्रादुर्भाव असून विद्यमान खासदार, आमदारांना कोणत्याही प्रकारचा स्थानिक विकास निधी आलेला नाही. त्यामुळे मतदार संघात माजी आमदार सौ. कोल्हे यांनी आणलेल्या निधीतील मंजुर झालेली विकासकामे सुरू आहे.

मात्र शासकीय शिष्टाचारानुसार त्याचे श्रेय कोणाला जात असेल म्हणजे ती कामे त्यांनी मंजुर केले असे म्हणता येणार नाही, परंतु या श्रेयवादात जाण्यापेक्षा आज करोनाच्या परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. सर्वसामान्य माणूस मेटाकुटीस आलेला आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे श्री. लबडे म्हणाले.

यावेळी विठ्ठलराव नवले, जयराम वारकर, उपसरपंच शिवाजीराव वारकर, अशोकराव नवले, रमेश नवले, संतोप ठुबे, ज्ञानेश्वर पवार, चांगदेव नवले, संजय भवर, घनश्याम वारकर, मछिंद्र नवले, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच धोत्रेचे सरपंच अशोक गवारे, सुरेश जाधव, विजय जामदार, प्रदीप चव्हाण, विजय काटे, गोरख टुपके, रोहीदास जाधव, बाबासाहेब जाधव, ठेकेदार किशोर परजणे उपस्थित होते

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post