या परिसरात फुटली पाण्याची लाईन ; त्यामुळे शहरातील...



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्यजलवाहिनी विळद पंपिंग स्टेशन येथे पाण्याच्या व हवेच्या दाबाने फुटल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

रविवार दुपारी ही जलवाहिनी फुटली. याचे दुरुस्तीचे काम महानगरपालिके मार्फत तातडीने हाती घेण्यात आले असून कामास अवधी लागणार असल्याने आज पाणी वाटप सुरु असलेल्या स्टेशनरोड परिसराचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यांना सोमवारी (दि.20) रोजी नेहमीच्या वेळेतं पाणी पुरवठा होईल असे सांगण्यात आले आहे.

तसेच रोटेशन नुसार शहराच्या मध्यवर्ती भागास झेंडीगेट, रामचंद्र खुंट, हातम पुरा, कोठला, मंगलगेट, कचेरी, माळीवाडा, या भागासह सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलणी परिसर, प्रेमदान हाडको, टिव्ही सेंटर व बुरूडगांवरोड या भागास पाणी पुरवठा होणार नसुन या भागास मंगळवारी (दि.21) रोजी पाणी पुरवठा होणार आहे.

मंगळवार रोजी रोटेशन नुसार शहराच्या मध्यवती भागास सिद्धार्थ नगर, लालटाकी, दिल्लीगेट, चितळे रोड, तोफखाना, नालेगांव, आनंदी बाजार, इ. भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असुन या भागास बुधवार (दि.22) रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरिने करून, पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post