अहमदनगर पोलिसांची मोठी कारवाई


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहरातील झेंडीगेट परिसरात सहा ठिकाणी सुरू असलेल्या कत्तलखान्यावर शहर पोलिसांनी छापे टाकले. या छाप्या दरम्यान 73 जिवंत गोवंश जातीचे जनावरांची सुटका करण्यात शहर पोलिसांना यश आले. एकुण 12 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

याप्रकरणी कत्तलखाने चालविणारे अमन बाबु शेख (रा. भूषणनगर, केडगाव), अदली इक्बाल कुरेशी, रिजवान मुस्ताक शेख (दोघे रा. बाबा बंगाली, झेंडीगेट), सलिम अकबर चौधरी (रा. तापकीर गल्ली, नगर), नजीर अहमद शब्बीर कुरेशी, बबलु इस्माईल कुरेशी, फिरोज समशेर शेख (तिघे रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट) यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि 269, 34 सह महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम, प्राणी क्लेश प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post