ऑनलाईन अन् काराखान्यातूच होणार यंदा श्रींची खरेदी



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - यंदाच्या गणेशोत्सवावर करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लक्ष लावण्यात आले असल्याने आता गणेश भक्तांना उत्साहाला मुरड घालावी लागणार आहे. या निर्बंधाचा मोठा फटका मुर्तीकार व श्री मुर्ती विक्रेते यांना बसला आहे.

गेल्या तीन महिन्यात मुर्ती बनविण्यासाठी कच्चा माल न मिळाल्यामुळे यंदा गणेश मुर्तीच्या किंमतीत 25 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा गणेश मुर्ती स्टॉलला बंदी घालण्यास आल्याने गणेशभक्तांना कारखान्यात जाऊन किंवा ऑन लाईन स्वरुपात मुर्ती बकींग किंवा खरेदी करता येणार आहे.

करोनाच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी देशभरात 23 मार्चपासुन सुरू झालेला लॉकडाऊन सुमारे तीन मिंहने चालला. याच काळात प्रामुख्याने राज्यात गणेश मुर्ती तयार करण्याचे काम सुरू होऊन याचा शेवट हा ऑगस्ट महिन्यात होता. मात्र यंदा करोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे मुर्ती कारागिर यांना कच्चा माल विशेषत: रंग व माती मिळाली नसल्याने याचा मोठा फटका कारागिरांना बसला आहे.

यानंतर अजुनही राज्यातील करोना संसर्गाची स्थिती कायम असुन यामुळे संपुर्ण गणेशोत्सवावर राज्य शासनाने अनेक निर्बंध घातले असल्याने यंदा गणेशोत्सव साध्या प्रमाणात साजरा करावा लागणार असुन मोठ्या मंडळांच्या आरासांवर व गणेश मुर्ती स्टॉल लावण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.

तसेच दोन फुटांच्या श्री मुर्तीची परवानगी देण्यात आली आहे. अशा पार्श्वभूमीवर लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर गणेश मुर्ती कारागिरांनी आता मुर्ती तयार करण्याचे काम हाती घेतले असुन दरवर्षी बनविल्या जाणार्‍या मुर्तीपैकी यंदा केवळ 50 टक्केच मुर्ती तयार होणार आहे.

यंदा कच्चा मालाच्या वाढलेल्या भावामुळे आणि कर्मी मुर्ती यामुळे गणेश मुर्ती किंमतीत वाढ होणार आहे. आता सरासरी 20 ते 30 टक्के इतकी वाढ मुर्तीच्या दरात होणार आहे.

गणेश मुर्ती विक्रीसाठी गणेशभक्तांना आता थेट कारखान्यात धाव घ्यावी लागणार असुन सामाजिक अंतर राखत विक्रीचे काम मुर्तीकारांना करावेत लागणार आहे. यंदा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्ती तयार करण्यात शासनाने मान्यता दिली आहे.

तसेच यंदाचे करोना सावट लक्षात घेऊन शासनाकडुन पर्यावरण पुरक गणेशोत्सवावर भर देण्याचे आवाहन करण्यातत आले आहे.

याच पार्श्वभूमीवर काही मुर्तीकारांनी मुर्ती बनविण्याचे काम सुरू केले आहे. गणेशभक्तांना आता मुर्ती खरेदी ऑन लाईन करता येणार आहे. नाशिक शहरात काही पर्यावरण प्रेमी व्यक्तींकडुन काळ्या व लाल रंगाच्या मातीच्या पर्यावरण पुरक मुर्ती तयार करण्याचे काम सुरू असुन पर्यावरण संवर्धनास यातून हातभार लावण्यासाठी गणेशभक्तांनी पुढे यावेत असे आवाहन पर्यावरण प्रेमींनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post