मुख्यमंत्री आज पुण्यात घेणार कोरोनाचा आढावा


माय अहमदनगर वेब टीम
पुणे - पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी पुण्याचा दौरा करणार आहेत. या वेळी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत. 

पुण्यावर अन्याय केला जात आहे. पुण्यात क्‍वारंटाईन सेंटर, आयसीयू बेड वाढवण्याची गरज आहे. मात्र, पुणे, पिंपरी पालिकेला एकाही नव्या पैशाचे अनुदान राज्य सरकारने दिलेले नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा उद्याचा पुणे दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या वेळी मुख्यमंत्री विरोधकांना उत्तर देणार का, याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.  पुण्यात कोरोनाचा कहर सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्याला आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः  उत्तर देणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी सकाळी पुण्याच्या दौर्‍यावर जाणार आहेत. या वेळी ते कोरोना निर्मूलन आढावा बैठक घेणार आहेत. बैठकीत पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात कोरोनासंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांचीही माहिती घेतली जाईल. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विभागीय आयुक्‍त, पुणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित असणार आहेत.  राज्यातील सरकार मुंबईकडे जितके लक्ष देते तितके पुण्याकडे देत नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post