पीएम मोदींच्या हस्ते मॉरिशस सुप्रीम कोर्टाच्या इमारतीचे उद्घाटन



माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्या हस्ते मॉरिशस देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन गुरुवारी (दि.३०) रोजी करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हे उद्घाटन झाले. मॉरिशसच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले प्रेम पुन्हा एकदा दाखवून दिली असल्याची भावना प्रविंद जगन्‍नाथ यांनी यावेळी व्यक्‍त केली. भारत आणि मॉरिशस यांच्यातील संबंध दिवसेंदिवस वृध्दींगत होतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. 


कोरोना संक्रमणाचा मॉरिशसने अत्यंत प्रभावीपणे मुकाबला केल्याबद्दल आपण मॉरिशस सरकारचे तसेच येथील जनतेचे अभिनंदन करतो, असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. संकटाच्या या घडीला औषध व इतर अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करुन भारताने आपले कर्तव्य पार पाडले आहे. दोन्ही देश न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचा आदर करतात. लोकशाहीत न्यायव्यवस्था हा महत्वाचा पाया असल्याचे आपण अधोरेखित केलेले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाची नवी इमारत आधुनिक रचना आणि उत्‍तम बांधकामाद्वारे बांधण्यात आली आहे. सागर अर्थात सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन दि रिजनचा दृष्टीकोन सर्वप्रथम आपण मॉरिशसमध्ये बोलून दाखविला होता. हिंद महासागरात असलेला मॉरिशस नेहमी भारताच्या हृदयाजवळ राहील, असेही नरेंद्र मोदी म्हणाले

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post